Saturday, May 18, 2024
Homeजिल्हाओझरच्या पोलिसाला लाच घेताना एनसीबीने पकडले

ओझरच्या पोलिसाला लाच घेताना एनसीबीने पकडले

नाशिक : नाशिक ग्रामीण पोलिस दलात लाचखोरीची कीड खोलवर रुजल्याचे दिसून येत आहे. वडनेर भैरव येथील दोन पोलिस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडले. त्याला एक दिवस उलटत नाही तोच ओझर पोलिस स्टेशनमधील हवालदार कारभारी भिला यादव हा २ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ सापडला आहे. पंचवटीतील सीता गुंफा परिसरात हा सापळा रचण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

तक्रारदार यांच्याविरुध्द न्यायालयात दाखल असलेल्या N.I.Act कलम १३८ चेक बाउंसच्या केस मध्ये तक्रारदार यांच्या विरुद्ध न्यायालयाने काढलेल्या पकड वारंट मध्ये तक्रारदार यांना न्यायालयात हजर करण्यासाठी तसेच त्यांच्या विरुद्ध असलेल्या पकड वारंट मध्ये जमीनदार यांचे कागदपत्र घेऊन, पकड वारंट मध्ये सहकार्य करण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडून २ हजार रूपये लाचेची ची मागणी करून सदर लाचेची रक्कम २ हजार रूपये स्वीकारताना पोलीस हवालदार कारभारी भिला यादव वय ५२ वर्षे यांना सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आले या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सापळा अधिकारी आणि नाशिक अँन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस निरीक्षक साधना इंगळे, सापळा पथकात पोलिस हवालदार सचिन गोसावी, नितीन कराड, प्रवीण महाजन, प्रभाकर गवळी या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.

पुणे येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन, 1600 जागांसाठी भरती

कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 26 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

कामगार आणि रोजगार मंत्रालय येथे 130 रिक्त जागांसाठी भरती, 50000 रुपये पगाराची नोकरीची सुवर्णसंधी


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय