Saturday, May 4, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपंतप्रधान मोदींचा उद्या देहू दौरा, माजी नगरसेवकाचा उपोषणाचा इशारा

पंतप्रधान मोदींचा उद्या देहू दौरा, माजी नगरसेवकाचा उपोषणाचा इशारा

पंतप्रधानांचे वेधण्यासाठी माजी नगरसेवक मारुती भापकर उपोषण करणार

पिंपरी चिंचवड : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार भारतीय रेल्वे लगतच्या पन्नास-साठ वर्षापासून वास्तव्य करत असलेल्या कायदेशीर घोषित लाखो झोपडपट्टीवासींवर रेल्वे प्रशासन कारवाई करत  आहे. त्यामुळे पुणे, मुंबईसह संपूर्ण देशातील लाखो गोरगरीब वंचित विस्थापित होत आहेत. रेल्वे लगतच्या विस्थापित झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनच्या मागणीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी उद्या उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी सांगितले कि, आम्ही पीएमओशी आणि केंद्रिय मंत्रीमहोदयाशी अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. मात्र त्यावर आमच्या पत्राची कुठलीही दखल घेतली नाही. मंत्री महोदयांना भेटण्याचा प्रयत्न आम्ही केला असता‌. त्यांच्या उत्तरानुसार ते या कारवाईवर ठाम आहेत, असे दिसते. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे कायमस्वरूपी विस्थापित होणारे लोक भयभीत आहेत. या विस्थापित होणाऱ्या झोपडपट्टयांचे पुनर्वसनाबाबत राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था बरोबरच केंद्र सरकारची देखील कायदेशीर व घटनात्मक जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.

केंद्र आणि राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्था व केंद्र सरकारने संयुक्तरीत्या या विस्थापितांची पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारावी या मागणीसाठी व लोकांच्या प्रश्नांकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी उद्या १४ जुन रोजी श्री क्षेत्र देहू नगरी या ठिकाणी उपोषण करण्याचा इशारा भापकर यांनी दिला आहे.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय