Thursday, January 16, 2025
Homeजुन्नरजुन्नर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळेगाव येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन 

जुन्नर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळेगाव येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन 

जुन्नर / आनंद कांबळे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळेगाव येथे आज दिनांक 2 ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त या थोरांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर उलगडावा, या थोर महापुरुषांच्या जीवनपटातून विद्यार्थ्यांना प्रेरणा घेता यावी यासाठी शाळा गोळेगाव येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त बालसभेचे आयोजन करण्यात आले होते. Organizing Oratory Competition at Zilla Parishad Primary School Golegaon

यानिमित्ताने ‌महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्रीजी यांच्या प्रतिमांचे पूजन मुख्याध्यापक शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी केले व प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

लहान गट इयत्ता पहिली ते पाचवी प्रथम क्रमांक श्रावणी जीवन शेटे, द्वितीय क्रमांक वैष्णवी शैलेश माळी, मोठा गट इयत्ता सहावी- सातवी प्रथम क्रमांक समृद्धी राजेंद्र बिडवई, द्वितीय क्रमांक मनस्वी विवेक लोखंडे ,तृतीय क्रमांक सृष्टी सचिन डोके व अनुष्का दशरथ वाणी यांनी पटकावले. त्यांचे अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षक उमेश शिंदे व मुख्याध्यापक मोहन नाडेकर यांनी महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनपटा विषयी माहिती सांगितली. 

विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या मनोगतातून विद्यार्थ्यांना सत्य, अहिंसा, सत्याग्रह, ‌सविनय कायदेभंग, असहकार चळवळ, दांडी यात्रा, चलेजाव चळवळ, स्वातंत्र्य चळवळीतील या दोन्ही महान नेत्यांचे योगदान तसेच स्वातंत्र्योत्तर कालखंडातील लालबहादूर शास्त्री यांचे हरितक्रांतीतील योगदान याविषयी माहिती मिळाली.

या‌बालसभेचे अध्यक्षस्थान इयत्ता सहावीची विद्यार्थीनी शुभ्रा शरद बिडवई हिने भूषवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी प्रशांत ताम्हाणे या विद्यार्थिनीने केले. प्रज्ञा महेश ताम्हणे या विद्यार्थिनींनी आ‌भार मानले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केल्यानंतर अध्यक्षांच्या परवानगीने बालसभेची सांगता करण्यात आली.

संबंधित लेख

लोकप्रिय