Saturday, May 11, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडअनाथ आश्रमातील मुलांसाठी चित्रपटांचे आयोजन

अनाथ आश्रमातील मुलांसाठी चित्रपटांचे आयोजन

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:शहरातील विविध सेवाभावी संस्थांमध्ये अनाथ,अपंग,निराधार मुलांना मोठ्या पडद्यावरील चित्रपट पाहणे दिवास्वप्न असते.त्या मुलांना चित्रपटाचा आनंद मिळवून देण्यासाठी
मावळचे युवा नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते देवा भाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून नुकताच प्रदर्शित झालेला घर, बंदुक,बिर्याणी हा नागराज मंजुळे यांचा चित्रपट मुलांना दाखवण्याच्या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन केले,मुलांमध्ये आनंद निर्माण व्हावा त्यांच्या मनावरती चित्रपट पाहून समाधान निर्माण व्हावे या हेतूने हा कार्यक्रम केल्याचे गायकवाड यांनी सांगितले त्यानुसार या कार्यक्रमाची आयोजन करण्यात आले.

बाल आश्रमातच राहूनच आपले उच्च शिक्षण पूर्ण करणाऱ्या अनाथ मुलांसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या अमृता करवंदे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले, हे चित्रपट पाहण्यासाठी पुणे अंध मुलांची शाळा,सेवा मित्र मंडळ, सेंड फ्रीसपी होम कन्या शाळा,सूर्यदेव फाउंडेशन बचपन फाउंडेशन तसेच जिजाऊ फाउंडेशन या संस्थातील अंध, अनाथ, निराधार जवळपास ३५० मुलांनी चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला .

आण्णा जोगदंड म्हणाले कि “एक दिवस आनंदाचा “या उपक्रमार्गत चित्रपट मुलांना दाखवण्याचा उपक्रम घेण्यात आला. चित्रपट चालू होण्यापुर्वी सर्वानी उभे राहून राष्टगीत गायले व मध्यान्ह मध्ये मुलांना खाऊ वाटप केले. विकास कुचेकर म्हणाले कि, आपल्याला समाजाचे काहीतरी देणे आहे आणि आपण ते दिले पाहिजे या उदात्य भावनेतून आम्ही हे सामाजिक काम केले.
मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य फुलण्यासाठी स्वतः अभिनेता आकाश ठोसर यावेळी उपस्थित होते.त्यांनी मुलांशी सुसंवाद केला. यावेळी मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे संस्था अध्यक्ष विकास कुचेकर व पिंपरी चिंववड शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी मध्यान्ह मध्ये त्यांना संघर्ष मानवी हक्काचा पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्येकर्ते देवाभाऊ गायकवाड,अमृता करवंदे,मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रुतीचे संस्थापक अध्यक्ष विकास कुचेकर,पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, महाराष्ट्र सचिव,आण्णा मंजुळे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड, महीला शहराध्यक्षा मीनाताई करंजावणे,उपाध्यक्ष विकास शहाणे,कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी,आकाश आखरे,लखन वाघमारे, गणेश चाटे,सागर ,पवार, शिरीष मोहीते,ईत्यादी सह अनेक संस्थाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय