Friday, December 27, 2024
Homeशिक्षणडॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती - २०१९ करिता ऑनलाईन अर्ज सुरू

डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती – २०१९ करिता ऑनलाईन अर्ज सुरू

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकारिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती – २०१९ (BANRF – २०१९) साठी १०६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात येत आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

अधिक माहितीसाठी बार्टी, पुणेच्या संकेतस्थळावर https://barti.maharashtra.gov.in   ला भेट द्यावी. ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि : १५ फेब्रुवारी २०२१  ते दिनांक : १५ मार्च २०२१ पर्यंत असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे चे महासंचालक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय