Wednesday, January 15, 2025
HomeNewsजागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिका सुषमा घोडे यांचा सन्मान

जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिका सुषमा घोडे यांचा सन्मान

आंबेगाव : आदिम संस्थेच्या वतीने जागतिक परिचारिका दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय घोडेगाव येथे कार्यरत असणाऱ्या परिचारिका सुषमा घोडे यांचा परिचारिका दिनाचे औचित्य साधत विशेष सन्मान करण्यात आला.

मागील वर्षांपासून आदिम संस्थेच्या वतीने जागतिक परिचारिका दिनानिमित्त प्रामाणिकपणे काम करणाऱ्या परीचारिकांचा विषेश सन्मान केला जातो. त्यांच्या प्रामाणिक कामाची दखल घेण्याचा हा छोटासा प्रयत्न संस्थेच्या वतीने केला जातो.

मेगा भरती : स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत 2065 पदांची भरती, 10 वी ते पदवी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी

घोडेगाव येथे छोटेखानी कार्यक्रमात ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. गणेश शेंगाळे व प्रा. सागर पारधी यांच्या हस्ते परिचारिका सुषमा घोडे यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा फोटो, पुष्पगुच्छ व पुस्तक  देऊन सन्मानित करण्यात आले.

सार्वजनिक किंवा खाजगी आरोग्य व्यवस्थेत परिचारिका यांचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे, अशी मांडणी यावेळी डॉ.शेंगाळे यांनी केली.

“या” महिन्यात सरकारी विभागात कुठे कुठे होणार भरती, वाचा एका क्लिकवर

यावेळी किसान सभेचे राजु घोडे, एस.एफ.आय. संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष अविनाश गवारी, आदिम संस्थेचे नंदन लोंढे, अर्चना गवारी, ज्योती वाळुंज आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन अविनाश गवारी यांनी केले.तर कार्यक्रमाचे संयोजन अनिल सुपे, नंदन लोंढे, अर्चना गवारी यांनी केले.


संबंधित लेख

लोकप्रिय