Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

दिल्लीत भीषण आग ; 27 जणांचा होरपळून मृत्यू !

---Advertisement---

---Advertisement---

दिल्ली:  दिल्लीत शुक्रवार, १३ मे रोजी एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. दिल्लीच्या मुंडका मेट्रो स्टेशनजवळील इमारतीला लागलेल्या आगीत २७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

अकोला जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड !

काल संध्याकाळी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एका ऑफिसमध्ये आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

संयुक्त अरब अमीरातचे राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांचे निधन ; ४ दिवसांचा दुखवटा जाहीर!

मुंडका मेट्रो स्टेशनजवळील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे बनवणाऱ्या कंपनीच्या कार्यालयाला संध्याकाळी ४.४० वाजता आग लागली. अग्निशमन दलाच्या २४ गाड्यांनी अथक प्रयत्नांनंतर मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास आग आटोक्यात आणली. दरम्यान या दुर्घटनेत २७ जणांचा होरपळून मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आगीतून ५० ते ६० जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles