मध्यप्रदेश : सिधी जिल्ह्यात आठ पत्रकारांना पोलिसांनी अटक केली, त्यांना पोलीस ठाण्यात नग्न करून त्यांचा व्हीडिओ व्हायरल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे.
सिद्धीचे पोलीस अधीक्षक मुकेश श्रीवास्तव यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, अटक करण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तींना अशा प्रकारे वागणूक देता येत नाही, दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. पोलिसांचे हे अतिशय लाजिरवाणे कृत्य प्रसारित झाल्यावर संतप्त प्रतिक्रिया समाज माध्यमावर पोस्ट करण्यात आल्या.
मोठी बातमी : गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस कोठडी, तर कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी
फोटोतील आठ जणांपैकी एक पत्रकार कनिष्क तिवारी यांनी सांगितले की, आम्ही हिंदी न्यूज चॅनल न्यूज नेशनवर स्ट्रिंगर म्हणून काम करतो आणि बघेली भाषेत एमपी संदेश न्यूज 24 हे यूट्यूब चॅनेल देखील चालवतो.
तिवारी यांनी दावा केला आहे की 2 एप्रिल रोजी जेव्हा ते त्यांच्या कॅमेरा पर्सनसह बातम्या करण्यासाठी गेले होते, तेव्हा स्थानिक पोलिसांनी त्यांना मारहाण केली आणि कोतवाली पोलिस ठाण्यात नेले. भाजप आमदाराच्या विरोधात बातम्या दिल्या म्हणून पोलिसांनी आम्हाला अटक केली आणि ठाण्यात फक्त अंतर्वस्त्रे ठेऊन आमचे व्हडिओ काढले.
संतापजनक ! सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
“मला मारहाण करण्यात आली, विवस्त्र करण्यात आले आणि धमकी देण्यात आली की मी आमदार आणि पोलिसांविरुद्ध तक्रार केल्यास मला अंडरवेअर घालून शहरात फिरायला लावले जाईल. आमच्यापैकी दहा जणांना आयपीसी कलमांतर्गत अटक करण्यात आली. आम्हाला शिवीगाळ, मारहाण आणि अपमानित करण्यात आले. मी पत्रकार आहे हे कोतवाली पोलिसांना माहीत होते, पण तरीही मी आमदारांच्या विरोधात बातम्या का चालवतो, असा सवाल त्यांनी केला.
माझ्या कॅमेरामन आणि इतरांना 2 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता अटक करण्यात आली आणि 3 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 च्या सुमारास सोडण्यात आले.
कोरोना उद्रेक : ‘या’ देशात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा, तर चुंबन आणि एकत्र झोपण्यावरही बंदी
आयटीआय पास विद्यार्थ्यांसाठी संधी ! इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1625 जागांसाठी भरती