सामाजिक न्याय विभागाच्या पिंपरी येथील बैठकीत निर्णय
पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागाच्या वतीने येत्या 23 तारखेला छत्रपती संभाजीनगर येथे संविधान गौरव महामेळावा आयोजित करण्यात येणार आहे.त्याची पूर्व तयारी व आढावा बैठक आज पार पडली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला होता तेव्हाच त्यांनी फुले शाहू आंबेडकर विचार घेऊनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करेल,संविधानाला व त्याच्या मूल्याला कुठं ही धक्का लागणार नाही व सर्व बहुजनांच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्य करेल ही भूमिका मांडली होती.तीच भूमिका संविधान गौरव महामेळाव्या मधून अधोरेखित करण्यात येणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार व अजित पवार यांचे कार्य घराघरात पोहचवण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे व संविधान गौरव महामेळावा अतिशय भव्य दिव्य होईल यासाठी प्रयत्न करावेत.असा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
सामाजिक न्याय विभाग पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजय औसरमल व त्यांच्या सहकाऱ्यांनी आजच्या बैठकीचे यशस्वी नियोजन केले.
आजच्या या बैठकीस सामाजिक न्याय प्रदेशाध्यक्ष प्रा.सुनील मगरे,पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे,प्रदेश सरचिटणीस गोरक्ष लोखंडे,प्रदेश उपाध्यक्ष संदीप चिंचवडे,सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा निहाय अध्यक्ष यामध्ये पुणे शहराचे जयदेव इसवे,सोलापूर जिल्ह्याचे प्रशांत भालशंकर,पुणे जिल्ह्याचे विकी लोखंडे,सातारा जिल्ह्याचे हरीश काकडे,सोलापूर शहरचे राजू बेनलागेवर,प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद साळवे,नितीन गायकवाड यांच्यासह ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे,खजिनदार दीपक साकोरे,महिला कार्याध्यक्ष कविता खराडे,गंगा धेंडे,निर्मला माने,प्रदेश उपाध्यक्ष सचिन औटे,शहर उपाध्यक्ष शशिकांत घुले,यश खैरारिया,कुमार कांबळे,शिवाजी गव्हाणे,विनय शिंदे,सागर कसबे, आकाश कडलग,अनिल औसरमल, रामकिसन माने,सिद्धार्थ जन्नू,सागर औसरमल,स्मिता मसुरे,जावेद रसूल शेख,संजय बनसोडे नितीन अडसूळ व इतर मान्यवर उपस्थित होते.