१) कोरोना बंदीस्त जागी हवेतून पसरू शकतो: जागतिक आरोग्य संघटना( WHO)
लंडन, ब्रिटन: २०० पेक्षा जास्त वैज्ञानिकांनी केलेल्या दाव्याची पडताळणी करून जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना हवेतून मोठ्याप्रमाणात पसरू शकतो याची शक्यता नाकारली. त्याच बरोबर कोरोना एखाद्या बंदिस्त जागी जेथे हवा वाहण्याची पुरेशी व्यवस्था नाही आणि कमी जागेत जास्त लोक एकत्र येतात तेथे हवेतून कोरोना पसरू शकतो अशी शक्यता व्यक्त केली.
२) नेपाळने दुरदर्शन व्यतिरिक्त भारताचे इतर चॅनल प्रसारण्यावरती बंदी घातली
काठमांडू, नेपाळ: नेपाळच्या नेत्यांचे चरित्र हणण करणाऱ्या बातमीदारांमूळे नेपाळने दुरदर्शन व्यतिरिक्त सर्व चॅनल प्रसारणावरती बंदी घातली. नेपाळ अशाप्रकारे चरित्र हणण करणाऱ्या देशविदेशी चॅनला कायद्यात बसवू शकतो असे नेपाळच्या माहिती आणि दुरसंचार मंत्री युबराज खातीवाला यांनी सांगितले.
३)अमेरिकन सरकारने परदेशी विद्यार्थ्यांसाठी नविन आणलेला शिक्षण नियम मागे घ्यावा यासाठी १३६ कॉग्रेसमॅन आणि ३० सिनेटरने राष्ट्राध्यक्ष ट्रम्पला निवेदन दिले
वॉशिग्टन, अमेरिका: डेमोक्राटिक १३६ कॉग्रेसमॅन आणि ३० सिनेटरने राष्ट्राध्यक्ष ट्रम्पला परदेशी विद्यार्थ्यांवर लादलेला नवीन शिक्षण नियन मागे घ्यावा असे निवेदन दिले. त्यामध्ये भारतीयवंशाच्या कमला हॅरिसचा पण समावेश आहे. जनतेच्या आरोग्याची राष्ट्राध्यक्ष ट्रम्पला चिंता नाही असाही आरोप डेमोक्राटिक पक्षाच्या वतीने राष्ट्राध्यक्ष ट्रम्पवरती केला गेला.
४) अमेरिकेने पाकिस्तान जागतिक हवाई सेवेची उडाने अमेरिकेत घेण्यास बंदी घातली
न्युयार्क, अमेरिका: फेडरल हवाई नियंत्रण कक्षाने पाकिस्तानी वैमानिकांच्या पात्रतेवरती काळजी व्यक्त केल्यानंतर पाकिस्तान जागतिक हवाईसेवेला चार्टर्ड विमानसेवा देण्याची संमती रद्द केली.
५) नेपाळच्या सत्ताधारी कम्युनिष्ट पक्षाची सर्वसाधारण सभा नेपाळमध्ये आलेल्या पूरामुळे एका आठवड्यासाठी पुढे ढकलली गेली
काठमांडू, नेपाळ: नेपाळच्या कम्युनिष्ट पक्षाची आज होणारी सर्वसाधारण सभा नेपाळमध्ये आलेल्या पूरामुळे एका आठवड्यासाठी पुढे ढकलली. त्यामुळे पंतप्रधान ओलींना त्यांच्या सत्तेचे भवितव्य ठरवण्यासाठी एक आठवड्याचा वेळ मिळाला आहे.
६) जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)आपले तज्ञ कोविड-१९ प्रसाराचा तपास घेण्यासाठी चीनला पाठवले
बीजिंग, चीन: जगातील १२० पेक्षा जास्त देशांनी चीनमध्ये कोरोना रोगाचा प्रसार कसा झाला याचे मूळ शोधण्यासाठी चीनची चौकशी व्हावी अशी मागणी संयुक्त राष्ट्रसंघात (UN) केल्यामूळे जागतिक आरोग्य संघटनेने आपले तज्ञ चीनला पाठवले.
७)सिंगापूरने आपत्ती काळात निवडणुक कशी घ्यावी हे जगाला दाखवून दिले
सिंगापूर: सिंगापूरने जागतिक आपत्ती काळात येणाऱ्या निवडणूका पुढे न ढकलता त्या कशा प्रकारे घेतल्या पाहिजेत हे जगाला दाखवून दिले. या निवडणूकीत २६.५ लाख लोकांनी मतदान केले. तसेच मास्क, हातमौजे, समानांतर अंतर , वृद्धांसाठी संध्याकाळी मतदान करण्याचा नियम आणि ५ मिनिटातच एकाचे मतदान करून झाले पाहिजे असा नियम मतदानासाठी घालण्यात आले होते.
८) दक्षिण अमेरिका आणि कॅरिबियन बेटे आता कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहेत: संयुक्त राष्ट्रसंघ( UN)
जिनिव्हा: संयुक्त राष्ट्रसंघाने दक्षिण अमेरिका आणि कॅरिबियन बेटे आता कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट झाले आहेत असे सांगितले. त्यामूळे तेथे बेरोजगारी आणि आर्थिक अडचण वाढण्याचे प्रमाण वाढू शकते असेही ते म्हणाले.
९) ताऱ्यांनी गेली चाळीस वर्ष वैज्ञानिकांना घातलेले कोडे सुटले
बीजिंग, चीन: ताऱ्यामध्ये होणारे लिथिअमचे उत्पादनाचे वैज्ञानिकांना पडलेले कोडे अखेर भारतीय वैज्ञानिकांच्या समूहाने सोडवले. जेव्हा तारा त्यांच्या नेहमीच्या आकारापेक्षा जास्त वाढत जातो. तेव्हा त्याचा उजेड वाढत जातो त्याला हेलिअम फ्लॅश म्हणतात. त्यावेळेस तो तारा लिथिअम तयार करतो. हा शोधनिबंध भरत कुमार आणि त्यांचा समूहाने प्रसिध्द केला.
१०)भारतातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा दर सरासरी २.७२ वरती आला: भारताचा आरोग्य विभाग
दिल्ली, भारत: जगभर थैमान घातलेल्या कोरोनामुळे मृत्युमुखी पडण्याचा भारतामधील दर २.८२% वरून २.७२ % वरती आला. भारतातील काही राज्यांमधील मृत्यूचा दर खूप कमी असल्याने सरासरी कमी आहे असे भारताच्या आरोग्य विभागाने सांगितले.
संकलन – अक्षय रघतवान