Tuesday, December 3, 2024
Homeजुन्नरNaneghat : घाटघर येथे गाईड प्रशिक्षण शिबिर यशस्वीरीत्या संपन्न

Naneghat : घाटघर येथे गाईड प्रशिक्षण शिबिर यशस्वीरीत्या संपन्न

Naneghat : जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील घाटघर येथे सातवाहन कालीन नाणेघाट, किल्ले जीवधन, तसेच धबधबे आणि निसर्गसौंदर्य यामुळे हजारो पर्यटकांची वर्दळ असते. येथील स्थानिक नागरिक पर्यटकांसाठी गाईड म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कौशल्यात सुधारणा होण्यासाठी आणि अधिक माहिती मिळावी यासाठी वनविभाग, घाटघर ग्रामपंचायत आणि आयसीआयसीआय फाउंडेशन यांच्या सहकार्याने आठ दिवसीय गाईड प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. (Naneghat)

या शिबिरात ४० युवकांनी सहभाग घेतला. आयसीआयसीआय फाउंडेशनचे गणेश बोरगे आणि पाखरे यांनी या युवकांना मार्गदर्शन केले. वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी या प्रसंगी युवकांशी संवाद साधताना पर्यटकांमध्ये सुरक्षितता आणि विश्वास निर्माण करण्याचे महत्त्व सांगितले. तसेच, त्यांनी युवकांचे प्रश्न आणि समस्या जाणून घेतल्या. चव्हाण यांनी लवकरच पर्यटनासाठी संकेतस्थळ सुरू होणार असल्याची माहिती दिली. (Naneghat)

या कार्यक्रमाला वनपाल फुलसुंदर, वनरक्षक राजेंद्र गायकवाड, सरपंच संघटनेचे अध्यक्ष पोपट रावते, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका लांबणीवर, वाचा काय आहे कारण !

सोयाबीनवरील विषाणुजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन

श्री विलेपार्ले केळवणी मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, धुळे अंतर्गत भरती

‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’द्वारे ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्र भेटीची इच्छा शासन पूर्ण करणार

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत भरती

संबंधित लेख

लोकप्रिय