डिवायएफआयचे अंकुश माचेवाड यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेवर महाघेराव आंदोलन
मुखेड (नांदेड) : मुखेड शहरातील वाल्मिक नगर , फुलेनगर मधील मालकी ताब्यातील घरे नमुना नं. आठ (अ) लावण्यासाठी सर्वसामान्य जनतेची मोठी लूट केली जात असल्याचा आरोप डेमोक्रॅटिक युथ फेडरेशनचे काॅम्रेड अंकुश माचेवाड यांनी केला आहे.
नगरपरिषद कार्यालयासमोर डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवक संघटनेच्या वतीने कॉम्रेड अंकुश माचेवाड यांच्या नेतृत्वाखाली वाल्मीक नगर व फुले नगर येथील शेकडो महिला पुरूष यांना सोबत घेऊन शहरातील मुख्य रस्त्याने मोर्चा काढून नगरपरिषदेसमोर हा महाघेराव धरणे आंदोलन चालू आहे.
मुखेड शहरातील वाल्मीक नगर व फुले नगर मधील मालकी ताब्यातील घरे नमुना नं. आठ (अ) लावण्यात यावे, घरकूल धारकांना शासनाच्या आदेशानुसार पाच ब्रास रेती मोफत तात्काळ उपलब्ध करून द्या, वाल्मीक नगर व फुलेनगर जाणाय्रा बसस्टाॅपला लागुन मुख्य रस्त्यावर असलेले अतिक्रमण तात्काळ हटवावे, मानवी वस्तीच्या बाजुने संरक्षण भितं बांधून द्यावी, पुरग्रस्त भागातील लाभार्थींयांची मंजूर अर्थिक निधी तात्काळ वाटप करावे, या मागण्या करण्यात येत आहेत. जो पर्यंत मागणी पुर्ण होणार नाही, तोपर्यंत येथुन उठणार नाही. असा निर्धार निगारिकांनी केला आहे.
मागील दोन वर्षापासून मुखेड नगरपरिषद कार्यालयाकडे वारंवार मागणी करुन सुध्दा नगरपरिषदेच्या अधिकारातील जतनेच्या मुलभुत प्रश्नाविषयी आज पर्यंत मार्ग काढण्यात आले नाही. तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून नमुना नं.आठ (अ) लावून देण्यासाठी भोळ्या भाबड्या जनतेकडून २५ ते ३० हजार रूपायची लूट केली जात आहे. जनतेची लुट करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करुन जनतेची होत असलेली लुट थांबवावी. तात्कालीन मुख्याधिकारी यांनी इस २००८ साली नगर परिषदेस करवाढ संदर्भात रिव्हीजन च्या माध्यमातुन अनेक घरे प्लॉट नमुना नं.आठ (अ) लावले होते. त्याचप्रमाणे राहिलेल्या नागरीकांचे सुध्दा घरे नुमना नं आठ (अ) लावण्यात यावे. कारण यांचे घरे संबंधीत मालकीच्या नावाने नसल्यामुळे प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेमध्ये व पुरग्रस्त निधीमध्ये नावे मंजुर असुन सुध्दा हे नागरिक वंचीत राहत आहेत.
त्यामुळे सर्व सामान्य जनतेचा विचार करुन मालकी ताब्यातील घरे नगर पालिकेच्या रिव्हीजन रजिस्टर्ड मध्ये नावाने तात्काळ नोंदवुन घेऊन न. नंबर आठ (अ) उतारा देऊन मागील दोन वर्षापासुन पेंडीग राहिलेला प्रश्न सोडवून सहकार्य करावे, अशा विविध मागण्या संदर्भात मुखेड नगरपरिषदे समोर महाघेराव धरणे आंदोलन चालू आहे.
या निवेदनावर काॅम्रेड अंकुश माचेवाड, बबलू देवक्ते, अदि बनसोडे, पंडरी अनमुलवाड, सचिन ऐलमे, केरबा होनराव यांच्या सह्या आहेत. तर या आंदोलनाला स्वाभिमानी संभाजी बिग्रेड चे तालुका अध्यक्ष हर्षवर्धंन पाटील, पवन जगडमवार, संदिप पिल्लेवाड आकाश देशटवाड, श्रीनिवास गोविंदवार, यांंनी पाठींबा दिला आहे.