Sunday, May 12, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडश्री सदस्य उन्हात अन्नपाण्याविना तडफडत होते तेव्हा 'श्रीमंत-श्रीमान'शाही मेजवानी झोडत होते!धक्कादायक सत्य...

श्री सदस्य उन्हात अन्नपाण्याविना तडफडत होते तेव्हा ‘श्रीमंत-श्रीमान’शाही मेजवानी झोडत होते!धक्कादायक सत्य आले समोर

खारघर : सेंट्रल पार्क मैदानावर झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 42 डिग्रीच्या रणरणत्या उन्हात सात ते आठ तास लाखो श्री सदस्य अन्नपाण्याविना तडफडत उष्म्याचा तडाखा सोसत बसले असताना दुसरीकडे मात्र याच मैदानावरील गारेगार शामियान्यात शाही पाहुण्यांसाठी पंचपक्वानांच्या जेवणावळी झडत होत्या.

पंगतीत वांग्याचे मसालेदार भरीत, वाटल्या डाळीचे कढीवडे, शेवयांची ड्रायफूट खीर, पाच प्रकारच्या कोशिंबिरी, केशरी भात, पंचामृत लाडू, पुरणपोळ्या, थंडगार पन्हे असा शाही बेत होता. ढोकळा, खांडवी, थेपले, उंधयू अशा गुजराती पदार्थांचीही खास रेलचेल होती. वाढप्यांची कॉर्पोरेट फौज हातात भरलेल्या थाळ्या घेऊन दिमतीला उभी होती.

केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शंभुराजे देसाई, उदय सामंत, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, प्रकाश सुर्वे आणि भाजप-शिंदे गटाचे नेते या शाही पंगतीचा आस्वाद घेत होते, त्याचवेळी बाहेर उष्माघात आणि चेंगराचेंगरीत अन्नपाण्याविना तडफडून 15 श्री सदस्यांचे बळी गेले.

श्री सदस्यांना उन्हात तडफडत ठेवून 15 जणांचे प्राण घेऊन जनतेचे करोडो रुपये तुम्ही इकडे उधळले का? असा संतप्त सवाल सोशल मीडियातून विचारण्यात येत आहे. शाही भोजनावळीचा हा पह्टो गुरुवारी व्हायरल झाला. त्यानंतर सर्व स्तरातून या प्रकाराचा निषेध होत आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय