Saturday, May 18, 2024
Homeराज्यकोकणात काही तासातच मान्सून होणार दाखल, ‘या’ जिल्ह्यांत होणार जोरदार पाऊस

कोकणात काही तासातच मान्सून होणार दाखल, ‘या’ जिल्ह्यांत होणार जोरदार पाऊस

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. देशात मान्सून वेळेआधी दाखल झाला आहे. मात्र, कर्नाटकमध्ये अडखळलेली मान्सूनची गाडी अखेर कोकणात येणार आहे. पुढील 48 तासात मान्सूनचे नैऋत्य वारे पुढे सरकरतील असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. 

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मध्ये भरती, 14 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

महाराष्ट्रात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहे. सध्या कोकणात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लवकरच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यातच आता हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाची शक्यता वर्तवली आहे. मात्र, सध्या कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागांत ढगाळ वातावरण असल्यानं उकाडा चांगलाच वाढला आहे. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 64 पदांसाठी भरती, 25000 ते 35000 रूपये पगाराची नोकरी

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या 48 तासात कोकणात मान्सून दाखल होणार असून पुढील चार दिवसात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, अहमदनगर, औरंगाबाद या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकल्यास मान्सूनची वाटचाल अधिक वेगाने होऊ शकते. त्यातच दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकण आणि घाट परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

नवीन भरती : बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे 113 रिक्त पदांसाठी भरती, आजच अर्ज करा

वन विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 20000 ते 40000 रूपये पगाराची नोकरी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय