Saturday, May 4, 2024
Homeग्रामीणमनसेचे जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे यांना अटक

मनसेचे जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे यांना अटक

औरंगाबाद:- पोलिसांनी परवानगी नाकारली असताना ही श्रीराम पुजन करताना गर्दी जमविल्या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरथे यांना आज अटक करण्यात आली आहे. टी व्ही सेन्टर येथे आज मनसे तर्फे श्रीराम पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेक मनसे कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मात्र पोलिसांनी या कार्यक्रमाच्या आयोजनास परवानगी आधीच नाकारली होती.तरीही जिल्हाप्रमुख दाशरथे यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पूजन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी तातडीने धाव घेत दाशरथे यांच्यासह शहर अध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, चंदू नवपुते यांच्यासह चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय