Monday, May 20, 2024
Homeराज्यआमदार लक्ष्मण जगताप यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

आमदार लक्ष्मण जगताप यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

विश्रांतीच्या सल्ल्यामुळे भेटण्यासाठी न येण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन

पिंपर चिंचवड, दि. २ : भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा झाल्यामुळे आज (गुरूवार) त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

काही दिवसांपासुन आमदार लक्ष्मण जगताप यांची तब्येत खालावलेली होती, त्यांच्यावर बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये गेल्या दीड महिन्यांपासून उपचार सुरू होते. आता रूग्णायालातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच डॉक्टरांनी आमदार लक्ष्मण जगताप यांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. आता त्यांना विश्रांतीची गरज असल्याने त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते व हितचिंतकांनी त्यांना भेटण्यासाठी निवासस्थानी गर्दी करू नये, असे आवाहन आमदार जगताप यांचे बंधू व माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी केले आहे.

जनतेच्या कृपा आणि डॉक्टरांच्या उपचारामुळे त्यांची प्रकृती चांगली झाल्याचे माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी सांगितले. त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच आमदार जगताप व यांचे बंधू लवकरच पुन्हा नव्या जोमाने आपल्या कामाला सुरूवात करतील, त्यावेळी ते सर्वांनाच भेटतील असेही ते म्हणाले.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय