Thursday, July 18, 2024
HomeNewsMister Mummy : रितेश देशमुख प्रेग्नंट?, ‘मिस्टर मम्मी’चे पोस्टर रिलीज!

Mister Mummy : रितेश देशमुख प्रेग्नंट?, ‘मिस्टर मम्मी’चे पोस्टर रिलीज!

 

महाराष्ट्र जनभूमी न्युज : रितेश दशमुख (riteish deshmukh) आणि जेनेलिया देशमुख(Genelia Deshmukh) हे बॉलिवूडमधील सर्वात गोंडस जोडप्यांपैकी एक आहेत. ३ फेब्रुवारीला दोघांच्या लग्नाला १० वर्षे पूर्ण झाली असून हे दोन कलाकार गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यावर दिसलेले नाहीत. 

पण, आता प्रतिक्षा संपली आहे. रितेश आणि जेनिलियाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. त्यांच्या लग्नाच्या दहाव्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘मिस्टर मम्मी’ (Mister Mummy) असे या चित्रपटाचे नाव आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट असून रितेश आणि जेनिलिया दशकानंतर एकत्रपणे मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध अधिकारी पदांच्या ५०० जागांसाठी भरती

निर्मात्यांनी चित्रपटाची घोषणा केली असून पोस्टरही रिलीज झाले आहे. या पोस्टरवर रितेश आणि जेनिलिया प्रेग्नेंट असल्याचे दाखवले आहे. 

‘मिस्टर मम्मी’चे (Mister Mummy) दिग्दर्शन शाद अलीचे असेल, तर भूषण कुमार आणि हेक्टिक सिनेमाज प्रायव्हेट लिमिटेड निर्मिती करत आहेत. चित्रपटाच्या कथानकातून जर एखादा पुरुष प्रेग्नंट झाला तर? या प्रश्नाचा वेध विनोदीशैलीद्वारे घेण्यात आला आहे.

ब्रेकिंग : पुणे जिल्ह्यातील शाळा “या” तारखे पासून पूर्णवेळ सूरू होणार

10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! परिक्षेच्या सरावासाठी मिळणार Question Bank !

रितेश आणि जेनलिया २०१२ मध्ये ‘तेरे नाल लव हो गया’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. लग्नानंतर या दोघांना पडद्यावर एकत्र येण्याची संधी मिळाली नाही. यादरम्यान रितेशने चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या, पण जेनिलिया चित्रपटांपासून दूरावली होती. 

रितेश आणि जेनिलिया यांनी २००३ मध्ये ‘मुझे तेरी कसम’ या चित्रपटातून एकत्र बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर दोघे २००४ मध्ये आलेल्या मस्ती या कॉमेडी चित्रपटात ते एकत्र दिसले. मिस्टर मम्मी (Mister Mummy) हा रितेश आणि जेनिलियाचा एकत्रीत असा चौथा चित्रपट आहे. जेनिलियाने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने २०२० मध्ये इट्स माय लाइफ या चित्रपटात काम केले होते.

गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय