Friday, April 4, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांवरील चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात

Manoj Jarange : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं यासाठी लढा देणारे मराठा समजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या जीवनावर आधारित “संघर्षयोद्धा” हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. मात्र आता हा चित्रपट सेन्सॉर बोर्डच्या कचाट्यात अडकला आहे.

---Advertisement---

मागील काही महिन्यांपासून ‘संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील’ (Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil) या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू होती. “संघर्षयोद्धा” हा चित्रपट 26 एप्रिल रोजी रिलीज होणार होता. मात्र, सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट अडवून धरला आहे. सध्या लोकसभा निवडणूक आहे. यापार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे सध्या चित्रपट प्रदर्शित करता येणार नसल्याचं सेन्सॉर बोर्ड म्हणणं आहे.

सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती केली आहे. तर, शिवाजी दोलताडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच, डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा केली आहे.

---Advertisement---

या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. चित्रपटात प्रमुख भूमिका, अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले, सिद्धेश्वर झाडबुके यांच्या आहेत.

दरम्यान, संघर्षयोद्धा हा चित्रपट जरी थांबवला असला तरीही 21 जून 2024 रोजी सर्वत्र चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सर्व मराठा समाज, महाराष्ट्र हा चित्रपट पाहिल. जर जाणूनबुजून चित्रपट आडवण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे, असं मनोज जरांगे म्हणालेत.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : सभेच्या मैदानासाठी बच्चू कडूंचा राडा, पोलिसांनीच भाजपचे गमचे…

मोठी बातमी : पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय, वाचा काय आहे कारण !

मोठी बातमी : MDH आणि Everest च्या काही मसाल्यांवर बंदी

खासदार श्रीरंग बारणे यांचा अर्ज दाखल

राज्यातील 11 मतदारसंघात २५८ उमेदवार रिंगणात

ब्रेकिंग : मतदान यादीत नाव नोंदविण्याची आज शेवटची तारिख, असा करा अर्ज !

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles