Thursday, December 26, 2024
Homeग्रामीणमंचर : वाढदिवसानिमित्त कोव्हीड सेंटरला मास्क व सॅनिटायझरची केली मदत

मंचर : वाढदिवसानिमित्त कोव्हीड सेंटरला मास्क व सॅनिटायझरची केली मदत

महेश घोडके व आकाश मोरडे यांचे आदर्शवत कार्य

मंचर (पुणे) : महेश घोडके व आकाश मोरडे यांंनी वाढदिवसानिमित्त कोव्हीड केअर सेंटरला मास्क व सॅनिटायझरची मदत करत आदर्शवत कार्य केले आहे. त्यांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे.

सध्या संबंध जगावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रत्येक जण आपआपल्या परीने प्रयत्न करताना दिसत आहे. अशातच  महेश घोडके व आकाश मोरडे यांच्या वाढदिवसानिमित्त अवसरी कोविड सेंटर येथे डॉक्टर, नर्सेस, इतर स्टाफ यांना 10 कॅड सॅनिटायझर  व 500 मास्क दिले. 

ही मदत डॉ. अजय पायगण, डॉ. काळे, डॉ. सोनल निघोट यांच्या कडे मल्हार प्रतिष्ठानचे संस्थापक  कप्पेश बाणखेले यांच्या हस्ते कोविड सेंटर येथे सुपूर्द करण्यात आले.

यावेळी माऊली लोखंडे, प्रशांत मोरडे, अक्षय राजगुरू, अक्षय मोरडे, जयेश भालेराव, शुभम गवळी, स्वप्नील लोखंडे, अजय जाधव, चेतन शेटे, ओंकार चिखले , विकी शिंदे, रोहन जंगम, आदित्य चौघुले हे उपस्थित होते.


संबंधित लेख

लोकप्रिय