Friday, December 27, 2024
Homeग्रामीणमंचर : शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष समन्वयक पदी आकाश मोरडे यांची निवड

मंचर : शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष समन्वयक पदी आकाश मोरडे यांची निवड

मंचर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष समन्वयक पदी आकाश मोरडे यांची निवड करण्यात आली.

शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्याचे नगरविकास / सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे व खासदार शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील व माजी खासदार श्रीकांत शिंदे व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे व व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे शहरप्रमुख राजाभाऊ भिलारे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आंबेगाव समन्वयक देविदास आढळराव पाटील यांच्या सूचनेनुसार आकाश मोरडे याची  शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या मंचर शहर समन्वयक पदी निवड करण्यात आली.

वैद्यकीय मदत कक्षाचा माध्यमातून गोरगरीब व गरजू व आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना व गंभीर महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या  गोरगरीब रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थ सहाय्य व्हावे म्हणून अनेक ट्रस्टच्या व आरोग्य योजनेच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या मार्फत मदत करण्यात येणार आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय