Tuesday, December 3, 2024
Homeताज्या बातम्याSoybean : सोयाबीनवरील विषाणुजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन

Soybean : सोयाबीनवरील विषाणुजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन

Soybean : सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅइक (विषाणूजन्य) रोगाचा दरवर्षी कमीअधिक प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो. पिवळा मोझॅइक संदर्भातील लक्षणे व उपाय खालीलप्रमाणे :-

पिवळा मोझॅइकची लक्षणे (Yellow Mosaic Virus – YMV)

रोगाच्या सुरुवातीला पानावर पिवळया रंगाचे छोटे-छोटे चट्टे दिसतात, तद्नंतर पानावर चमकदार पिवळया हिरव्या रंगाचे मोठ्या आकारचे चट्टे दिसतात व पाने पिवळ्या रंगात बदलतात. झाडे खुरटी व खुजी राहतात. रोगग्रस्त झाडाला फुलोरा उशिरा येतो व या फुलोऱ्यास जास्त शेंगा लागत नाही. रोगाचा प्रादुर्भाव मुख्यतः रोगग्रस्त बियाण्याद्वारे व दुय्यम प्रसार हा पांढऱ्या माशीद्वारे होतो.

सोयाबीन मोझॅइक विषाणूची लक्षणे (Soybean Mosaic Virus – SMV):

या रोगाचा प्रादुर्भाव सद्यजरी दिसून आला नसला तरी भविष्यातील खबरदारी म्हणून या रोगाची लक्षणे व व्यवस्थापन-

रोगग्रस्त झाडांची वाढ खुंटलेली दिसते. पाने आखुड, लहान, जाडसर, सुरकुतलेली होतात व पानाच्या कडा खालच्या बाजूने दुमडतात. पानामध्ये अत्याधिक हिरवेपणा दिसतो. पानाचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो. रोगग्रस्त झाडाला फुलोरा उशिरा येतो व या फुलोऱ्यास जास्त शेंगा लागत नाही. रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास बियाण्याच्या आवरणाचा रंग बदलुन करडा तपकिरी काळपट होतो. या रोगाचा प्रादुर्भाव मुख्यतः रोगग्रस्त बियाण्याद्वारे होतो व दुय्यम प्रसार हा मावा किडीद्वारे होते. (Soybean)

प्रतिबंधात्मक उपाय:-

सुरूवातीसच रोगग्रस्त झाडे आढळल्यास शेताबाहेर काढून नष्ट करावीत. पिकामधील व बांधावरील तण नियंत्रण करणे आवश्यक आहे.

नियंत्रणाचे उपाय:-

माशी व मावा किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतात पिवळे चिकट सापळे १५ x ३० सेमी आकाराचे एकरी २०-२५ या प्रमाणात पिकाच्या उंचीच्या समकक्ष उंचीवर लावावेत.

रोग/किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच पुढील प्रादुर्भाव रोखण्यासाठी पांढरी माशी व मावा या किडींच्या नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी.

इमीडाक्लोप्रीड १७.८ एसएल २.५ मिली किंवा फ्लोनिकॅमिड ५० टक्के डब्लुजी २ ग्रॅम किंवा थायोमिथोक्झाम २५ टक्के डब्ल्युजी ३ ग्रॅम किंवा अॅसिटामिप्रिड २५ टक्के + बायफेन्थ्रीन २५ डब्लुजी ५ ग्रॅम यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गरज वाटल्यास १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी. फवारणी करतांना किटकनाशके आलटून पालटून वापरावीत. (Soybean)

टिप: नियंत्रण उपायामधील रासायनिक किटकशाकांच्या शिफारसी या तदर्थ (Adhoc) स्वरुपाच्या आहेत.

(माहिती : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला)

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी :…तर लाडकी बहीण योजना थांबवू ; सर्वोच्च न्यायालयाचा इशारा

‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’द्वारे ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्र भेटीची इच्छा शासन पूर्ण करणार

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत भरती

मोठी बातमी : भारताला मोठा धक्का ; ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट अंतिम फेरीतून अपात्र

साप पकडताना सर्पमित्राला सापाचा दंश, सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू

संबंधित लेख

लोकप्रिय