कर्नाटक : धावत्या रेल्वेसोबत इन्स्टाग्राम रील बनवणे एका तरुणाच्या चांगलेच अंगलट आले आहेत. रील बनवण्याच्या नादात असलेल्या तरुणाला भरधाव रेल्वेने जोरदार धडक दिली.यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तरुणाचा मित्रच त्याचा रील व्हिडिओ बनवत होता. याप्रकरणी काझीपेठ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेलंगणातील काझीपेठमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. स्टंट करताना ट्रेनच्या धडकेने तरुण हवेत उडाला आणि रेल्वे रुळाजवळ पडला. गंभीर जखमी तरुणाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
रेल्वे गार्डला तरुण रुळावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसल्याने तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्याला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगून त्याला चांगल्या उपचारासाठी हैदराबादला हलविण्याची सूचना केली आहे.जखमी तरुणाची आई आणि भाऊ हे रोजंदारी मजूर असून रेल्वे ट्रॅकला लागून असलेल्या वस्तीत राहतात. त्याच्या वडिलांचे काही काळापूर्वी आजारपणामुळे निधन झाले होते.
सोर्स : टीव्ही9 मराठी
धावत्या रेल्वेसोबत इन्स्टाग्राम रील बनवणे पडले महागात ; तरुण गंभीर जखमी
संबंधित लेख