पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि. १८ : आमदार महेश लांडगे यांनी समाविष्ट गावे तसेच संपूर्ण दिघी परिसराचा कायापालट केला आहे असे प्रतिपादन माजी नगरसेविका निर्मला गायकवाड यांनी येथे केले. (Mahesh Landge)
निर्मला गायकवाड म्हणाल्या की, आमदार महेश दादा लांडगे यांनी संपूर्ण शहरासाठी मोठे योगदान दिले आहे. शास्तीकर माफ केला. पिंपरी चिंचवड साठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय आणले. समाविष्ट गावांसह दीघीचा तर संपूर्ण कायापालट केला. या भागात पाण्याची अडचण होती पाण्याच्या टाक्या बांधल्या. भामा आसखेड तसेच आंध्रा प्रकल्पातून पाणी आणले. महापालिकेची मराठी माध्यमाची शाळा अपुरी पडत होती. मैदान नव्हते हे लक्षात घेऊन चार मजली प्रशस्त इमारत बांधण्यात आली.
आता लवकरच त्या ठिकाणी इंग्रजी शाळा सुरू होत आहे. महिलांसाठी मॅटरनिटी होमचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. रस्त्यांचीही अनेक कामे मार्गी लावली आहेत. दिघी-भोसरी शिवरस्ता, दिघी भारत माता नगर ते मॅक्झिन सिमेंट रस्ता ही कामे महेशदादा लांडगे यांनी करून घेतली आहेत. प्रयत्नपूर्वक अनेक उपाययोजना केल्याने वाहतूक कोंडी कमी झाली आहे. सन २०१७ पासून आरक्षणे ताब्यात घेऊन अनेक कामे मार्गी लावण्यात आली. (Mahesh Landge)
दिघी येथील स्मशानभूमीसाठी पाच गुंठे जागा होती आता ८० गुंठे जागा मिळाली आहे. येणाऱ्या काळात स्मशानभूमीचे काम मार्गी लागणार आहे. दिघी सर्वे नंबर तीन उद्यानाचे आरक्षण आहे ही जागा ताब्यात आली आहे.
पुणे – आळंदी पालखी महामार्ग महेश लांडगे यांनी मार्गी लावला. दिघी सर्वे नंबर २० तसेच दिघी सर्वे नंबर तीन, ज्ञानेश्वरी पार्क या तीन ठिकाणी खेळाचे मैदान ताब्यात आले आहे. दत्तनगर ते जकात नाका ३० मीटरचा रस्ता करून घेतला आहे.
कोणाच्या घरांच्या भिंतीलाही धक्का लागू न देता आमदार महेश लांडगे यांनी अनेक विकास कामे केली आहेत. या विकास कामांच्या बळावर ते निश्चित विजयी होतील. असा विश्वास माजी नगरसेविका निर्मला गायकवाड यांनी व्यक्त केला.