Thursday, May 2, 2024
HomeNewsजनभूमी साहित्य: कविता - अभागी लेक - ना. सो. कुवर

जनभूमी साहित्य: कविता – अभागी लेक – ना. सो. कुवर



अभागी लेक

लेक दिली, दुर डोंगरा पल्ह्याड

तिचा संसार म्हणजे, टांगती तलवार…

राहे बापाकडे, तेव्हाही शीरीवर भार

सासरी जाऊनी, रोज ओलाच पदर…

बा चं दारिद्रय, आभाळाहुन ही मोठं

आई तर गेली, सोडून छकुलं छोटं…

कासावीस होते, आठवण येता आईची

असे रोजच भ्रांत, खाच भरणे पोटाची…

अशी कशी, गाठ बांधली दारिद्रयाशी

काम करुनी धनी, रात घालवी उपाशी…

ऐके दिवशी, सांगावा धाडीला दोनकोस

नागड्या पावलांनी, आली पळत वेशीत…

हुंदका फोडुन, माथा टेकला कुडीवर

बा चा सापळा, फाटक्या गोधडीवर…

होतं नव्हतं गेलं, झरे आटले वात्सल्याचे

कोरड्या पापण्यात, द्रुगजल ही सूकले…

तशीच ऊठली, धावे वाट वाकडी दुरची

भरल्या नेत्राळी, लेकरं निजली उपाशी…

ना. सो. कुवर

देवडोंगरा ता. त्र्यंबक

8698832473

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय