Thursday, December 12, 2024
Homeआरोग्यकोरोनाराज्यात १ लाख ४८ हजार ६०१ रुग्णांवर उपचार सुरू आज वाढली 'इतकी'...

राज्यात १ लाख ४८ हजार ६०१ रुग्णांवर उपचार सुरू आज वाढली ‘इतकी’ संख्या

(मुंबई)  :-  राज्यात आज ६ हजार ०४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६.७४ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या २ लाख १३ हजार २३८ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ९ हजार ४३१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ४८ हजार ६०१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

     आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १८ लाख ८६ हजार २९६ नमुन्यांपैकी ३ लाख ७५ हजार ७९९ नमुने पॉझिटिव्ह (१९.९२ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ८ हजार ४२० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार २७६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २६७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६३ टक्के एवढा आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय