Saturday, October 5, 2024
Homeसंपादकीयकव्हर स्टोरीमहाडच्या चवदार तळ्यावर दाटला जनसागर ,अनेक दिग्गजांनी लावली हजेरी !

महाडच्या चवदार तळ्यावर दाटला जनसागर ,अनेक दिग्गजांनी लावली हजेरी !

 

महाड : समाजातील जातीयवादाची दरी संपुष्टात यावी, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले. त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतीनिमित्त आज (रविवार) चवदार तळे सत्याग्रहाचा ९५ वा वर्धापन दिन महाडमध्ये साजरा केला जात आहे. यानिमित्त १९ मार्चपासून हजारो अनुयायी महाडमध्ये दाखल झाले आहेत.

आज सकाळपासूनच चवदार तळ्यातील पाणी प्राशन करण्यासाठी तसेच चवदार तळे व क्रांती स्तंभावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी हजारो भीमसैनिक, आंबेडकर प्रेमी, राजकीय नेते, पदाधिकारी यांनी गर्दी केली होती. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज सकाळी चवदार तळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले.

चवदार तळे क्रांती सत्याग्रहा निमित्त चवदार तळ्याच्या रस्त्याच्या दुतर्फा आंबेडकरी साहित्य पुस्तके विक्रीचे स्टॉल लागले होते सकाळी सहा वाजल्यापासूनच गर्दी दाटायला सुरूवात झाली होती दरवर्षी लाखो भिम अनुयायी या स्मारकाला भेट देत असतात यावर्षी विविध सामाजिक संघटनांतर्फे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आदिती तटकरे म्हणाल्या की, “२० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळे येथे पाण्याचा सत्याग्रह केला. तो केवळ अस्पृश्यांना पिण्याचे पाणी खुले करण्यासाठी दिलेला लढा नव्हता. तर त्यांच्या मुलभूत न्याय हक्कासाठी दिलेला लढा होता. जुलै महिन्यात जो महाप्रलय आला होता, त्यातून चवदार तळेही वाचले नाही. चवदार तळ्याची साफसफाई करण्यासाठी स्थानिक प्रशासन, महाड नगरपालिका व ठाणे महानगरपालिकेचे मोठे योगदान होते. चवदार तळ्यातील पाणी शुद्धीकरणासाठी जी यंत्रणा बसवण्यात आली आहे, असे सांगून डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अधिकाधिक प्रसारीत करण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जाईल, असेही आश्वासन तटकरे यांनी दिले.

संबंधित लेख

लोकप्रिय