कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पाठोपाठ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या पक्षांनीही गुरुवारी लोकसभेसाठी (Lok Sabha 2024) 16 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
डाव्या पक्षाने कोलकाता दक्षिण, हुगळी, बिष्णुपूर आणि आसनसोलसारख्या काही प्रमुख जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. डाव्या आघाडीने कोलकाता दक्षिणमधून माकपाच्या सायरा शाह हलीम, डम डममधून सृजन चक्रवर्ती, जादवपूर येथून सृजन भट्टाचार्य, सेरामपूरमधून दीप्सिता धर आणि तमलूक येथून सायन बॅनर्जी यांना उमेदवारी दिली आहे. (Lok Sabha 2024)
आम्ही फक्त 16 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. 16 उमेदवारांपैकी 14 उमेदवार नवीन आणि तरुण असल्याचे डाव्या आघाडीचे अध्यक्ष बिमान बोस यांनी सांगितले.
आता विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियामधील तृणमूल काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने सर्व 42 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. तर भाजपाने 20 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
हे ही वाचा
धक्कादायक : बाथरूममध्ये गेला अन् त्याने प्रायव्हेट पार्टला टोचलं इंजेक्शन; पुढे होत्याचे नव्हते झाले
Sky baby : महिलेची विमानात प्रसूती; पायलट बनला डॉक्टर, बाळाचा जन्म आकाशात
ब्रेकिंग : धुळ्यातील 200 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा
सावधान! “या” जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाचा अंदाज
मोठी बातमी : इलेक्टोरल बॉन्डची माहिती जाहीर भाजप मालामाल, हा मोठा घोटाळा..
मोठी बातमी : केंद्र सरकारकडून 18 OTT प्लॅटफॉर्मवर बंदची कारवाई, ‘ही’ आहे लिस्ट