Home ताज्या बातम्या Kalyan : कल्याण येथे लोकल ट्रेनचा डबा रुळावरून घसरला, लोकलचे वेळापत्रक कोलमडले

Kalyan : कल्याण येथे लोकल ट्रेनचा डबा रुळावरून घसरला, लोकलचे वेळापत्रक कोलमडले

Kalyan

मुंबई: शुक्रवारी कल्याणच्या स्थानकावर एक लोकल ट्रेन रुळावरून घसरुन मोठी दुर्घटना टळली आहे. (Kalyan)

या घटनेत कोणती ही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या अपघाताबाबत मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘कल्याण स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर लोकलचा डबा रुळावरून घसरल्याची घटना घडली.

ही घटना कल्याण स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर झाली,सदरची ट्रेन सीएस
टी कडे.जात होती. या घटनेमुळे कर्जत, कसाराकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या, कल्याणकडे येणाऱ्या लोकल खोळंबल्या (Kalyan)

कल्याण स्थानकाचे रेल्वे कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असली तरी दुसऱ्या ट्रॅकवरुन लोकल सोडण्यात येत होत्या.

Exit mobile version