पूर्णा (परभणी) : पूर्णा येथे कुष्ठरोग व क्षयरोग शोध अभियानास सुरुवात करण्यात आली आहे. समाजातील सर्व क्षयरोग व कुष्ठरुग्णाचा शोध घेऊन निदान निश्चितीनंतर औषधोपचार सुरू करणे अत्यंत महत्वाचे आहे. समाजातील कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण कमीत कमी कालावधीत शोधण्यासाठी महाराष्ट्र शासन दिनांक 1 डिसेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत अभियान राबविण्यात येत आहे.
पूर्णा शहरातील साधारणत: 2330 घरे व 11650 लोकसंख्याच्या सर्वेक्षणासाठी 15 प्रशिक्षित पथकांमार्फत सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे.
अंगावर न खाजणारा व बधिर चट्टा तसेच दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला ही अनुक्रमे कुष्ठरोग व क्षयरोगची लक्षणे आहेत. मोहिमेच्या यशस्वितेसाठी जिल्हा कुष्ठरोग सहायक संचालक डॉ. विद्या सरपे, डॉ. आईटवार, डॉ. गाडेकर, डॉ. काळे, श्रीमती गुट्टे, श्रीमती वारुळे आदीसह परिश्रम घेत आहेत.