Sunday, May 19, 2024
HomeNewsबारामतीत कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचा शुभारंभ

बारामतीत कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचा शुभारंभ

 

बारामती : ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित कृषी विज्ञान केंद्र बारामती च्या प्रक्षेत्रावर दिनांक 19 फेब्रुवारी 2022 बुधवार ते रविवार दिनांक 13 फेब्रुवारी 2022 पर्यंत आयोजित कृषी कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचा शुभारंभ बारामतीच्या नगराध्यक्ष माननीय सौ पौर्णिमाताई तावरे ,जिल्हा परिषद सदस्य सौ रोहिणीताई तावरे ,पंचायत समितीच्या बारामतीच्या सभापती निता ताई फरांदे, माळेगाव NIASM चे संचालक डॉक्टर हिमांशू पाठक शेतकरी कुटुंब आणि ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार व विश्वस्त यांच्या उपस्थितीत सकाळी नऊ वाजता नारळ फोडून झाले.

प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन, असा करा अर्ज !

कृषी यांत्रिकीकरण योजना 2022 कृषी अवजारे करिता 50 ते 80% अनुदान

या भव्य कृषी तंत्रज्ञान सप्ताहामध्ये 110 एकर क्षेत्रावर भाजीपाला व फुलांचे नावीन्यपूर्ण जातींची लागवड, संरक्षित शेतीचे विविध प्रयोग, खते देण्याच्या विविध पद्धती, एकात्मिक शेती प्रकल्प ,मधुमक्षिका पालन, मत्स्य शेती, मोत्याची शेती, प्रक्रियायुक्त पदार्थ निर्मिती, नाविन्यपूर्ण स्टार्टअप, इंनोवेशन्स आणि जातिवंत जनावरे आणि पशुपक्ष्यांचे दालन, भरड धान्याच्या विविध जाती त्यांचे प्रक्रिया उद्योग, आयात-निर्यात मार्गदर्शन ,औषधे वनस्पती ,भाजीपाला कलमी रोपे, जातिवंत कलमी रोपांची फळ वाटिका, देश-विदेशातील नॅनोटेक्नॉलॉजी, देशी विदेशी भाजीपाला, अत्याधुनिक मशिनरी, ड्रोन द्वारे फवारणी तंत्रज्ञान, सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर ,टिश्‍युकल्चर रोपे निर्मिती इत्यादी तंत्रज्ञान एकाच ठिकाणी पाहण्याची सुवर्णसंधी पुढील चार दिवस रविवार पर्यंत मिळणार आहे या सुवर्ण संधीचा फायदा राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा अशी महाराष्ट्र जनभूमी न्यूज तर्फे विनंती.

शेळी पालन योजना महाराष्ट्र, 75% अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरु, लगेच भरा!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय