Friday, May 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडकामगार नेते काशिनाथ नखाते यांच्यावर हल्ला, पुरोगामी संघटना करणार आंदोलन

कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्यावर हल्ला, पुरोगामी संघटना करणार आंदोलन

पिंपरी चिंचवड : महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ व कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या थरमॅक्स चौक, चिंचवड येथील कार्यालयात  दि.18 मे रोजी हल्ला करण्यात आला, या हल्ल्यातून ते सुखरूप बचावले आहेत. 

काशिनाथ नखाते हे फेरीवाला, बांधकाम कामगार, घरेलू कामगार, रिक्षाचालक आदिसह सुमारे 30 हजार असंघटीत कामगारांचे नेतृत्व करतात. गोरगरीब जनतेसाठी काम करणारे व कष्टकरी कामगारांना न्याय हक्क देणारे आज त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने पोलीस आयुक्तांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या हल्ल्याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहरातील पुरोगामी, श्रमिक, कामगार संघटनांच्या वतीने सोमवारी 23 मे रोजी पोलीस आयुक्त कार्यालय चिंचवड येथे आंदोलन करण्यात येणार आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय