प्रयागराज (क्रांतीकुमार कडुलकर) : दर तीन वर्षांनंतर एकदा अशा पद्धतीने बारा वर्षांत प्रयागराज, उज्जैन, नाशिक (त्र्यंबकेश्वर), हरिद्वार या चार वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पूर्ण कुंभमेळे भरत असतात. दर सहा वर्षांनी हरिद्वार व प्रयाग येथे अर्धकुंभमेळा (Kumbh Mela 2025) भरतो. बारा पूर्ण कुंभमेळ्यांनंतर तब्बल 144 वर्षांनंतर प्रयागराज येथे महाकुंभमेळा भरतो.
मुगलकालीन कागदपत्रांमध्ये कुंभमेळ्याच्या उत्सवाचे संदर्भ आढळतात. खुलासातू-त-तारीख या सोळाव्या शतकातील ग्रंथात असा उल्लेख असल्याचे इतिहासाचे अभ्यासक नोंदवतात. पण याविषयी सर्वच अभ्यासक एकमताने काही नोंदवतात असे नाही, त्यांच्यामध्येही मत- मतांतरे आहेत.
कुंभ मेळ्याशी (Kumbh Mela) संबंधित काही रोचक तथ्यः
साल 1954 मध्ये इलाहाबादमध्ये आयोजित कुंभ मेळ्यात 40 लाख लोकांनी भाग घेतला होता.
साल 1989 मध्ये प्रयागराजच्या कुंभ मेळ्यात 1.5 कोटी लोकांची उपस्थिती नोंदवली गेली होती.
साल 2013 मध्ये प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभ मेळ्यात 12 कोटी लोकांनी भाग घेतला होता.
यावर्षी देशभर आणि जगभरातून 40 कोटी भाविक प्रयाग राज येथे भाविक कुंभमेळ्यासाठी येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. (Kumbh Mela 2025)
कुंभ स्नान महत्त्वाची तिथी 2025: 13 जानेवारीपासून जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळ्याचा महाकुंभ सुरू होईल. महाकुंभाची सुरूवात मकर संक्रांती (Makar Sankranti 2025) दिवशी होईल आणि फेब्रुवारीमध्ये महाशिवरात्री (Mahashivratri 2025) च्या दिवशी त्याचा समारोप होईल.
हा त्याग आणि समर्पणाने भरलेला मेळा प्रत्येक 12 वर्षांनी होतो. या मेळ्यात भारतासह परदेशांतील हिंदू धर्मातील श्रद्धाळूही पवित्र नदीच्या संगमात स्नान करण्यासाठी जमा होतात. यावेळी 6 शाही स्नानाची तिथी आहे. त्यापैकी पहिला शाही स्नान पौष अमावस्येला रवि योगाच्या संयोगात होईल. यावेळी अनेक शुभ कार्य (Mahakumbh Tradition) केले जातात, त्यात शाही स्नानही समाविष्ट आहे, चला तर मग जाणून घ्या इथे (Maha Kumbh Shahi Snan 2025) शाही स्नानाचा शुभ मुहूर्त.
महाकुंभ 2025 शाही स्नानाची तिथी सामान्यतः कुंभ मेळ्यादरम्यान दररोज स्नान करणं खूप शुभ मानलं जातं. कुंभ मेळ्यादरम्यान त्रिवेणी संगमात स्नान करणं सनातन धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं. पण, या एक महिन्यात काही खास तारीख आहेत, ज्या शाही स्नानाची तिथी म्हणून ओळखल्या जातात. अशा मान्यतेनुसार, या दिवशी स्नान केल्याने सर्व जीवनाचे पाप धुतले जातात.
शाही स्नानाची तिथी… 13 जानेवारी 2025: पहिला शाही स्नान- 14 जानेवारी 2025, मंगळवार (मकर संक्रांती)
महाकुंभमेळ्याच्या मुख्य तारखा :
⦁ पौष पौर्णिमा – १३ जानेवारी २०२५, सोमवार, कुंभमेळा प्रारंभ
⦁ मकर संक्रांति – १४ जानेवारी २०२५, मंगळवार, शाही स्नान
⦁ मौनी अमावस्या – २९ जानेवारी २०२५, बुधवार, शाही स्नान
⦁ बसंत पंचमी – ३ फेब्रुवारी २०२५, सोमवार, शाही स्नान
⦁ माघ पौर्णिमा – १२ फेब्रुवारी २०२५, बुधवार, शाही स्नान
⦁ महाशिवरात्रि – २६ फेब्रुवारी २०२५, बुधवार, शाही स्नान
हिंदू पंचांगानुसार, पौष पूर्णिमेची सुरूवात 13 जानेवारी 2025 रोजी सकाळी 5 वाजून 03 मिनिटांनी होईल. त्याचप्रमाणे त्याचा समारोप दुसऱ्या दिवशी म्हणजेच 14 जानेवारी रोजी रात्री 3 वाजून 56 मिनिटांनी होईल. अशा प्रकारे या दिवशी स्नानाचा शुभ मुहूर्त देखील पाहता येईल.
हे ही वाचा :
अणूशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे निधन
जगातील सर्वाधिक पगार घेतो ‘हा’ भारतीय वंशाचा माणूस, पगार ऐकून थक्क व्हाल
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे सरकारने घेतले परत ? वाचा काय आहे प्रकरण !
चीनमध्ये पुन्हा कोरोनासारख्या नव्या विषाणूचा कहर, जगाची चिंता वाढली
मोठी बातमी : शेतकऱ्यांना मोठा दिलासा : ‘त्या’ जमिनी परत करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कंडोमपासून आलू भुजियापर्यंत ऑनलाईन विक्रमी खरेदी, यादी एकदा वाचाच !