Tuesday, January 21, 2025

PCMC : लोकशाहीवरचा सामान्यांचा विश्वास अबाधित ठेवण्याची पत्रकारांवर मोठी जबाबदारी – खा. डॉ. अमोल कोल्हे

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर लोकशाही प्रणालीवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नागरीकरणाच्या समस्या रोज आपल्यासमोर येत आहे, लोकसभा निवडणुकीनंतर एक आश्वासक चित्र निर्माण झाल्याचं लोक म्हणत असताना, विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात अनेक प्रश्न निर्माण झाले. (PCMC)

यामुळे लोकशाही प्रणालीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत या लोकशाही प्रणालीवर सर्वसामान्यांचा विश्वास अबाधित ठेवण्याची मोठी जबाबदारी पत्रकारांवर असल्याचे शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी सांगितले. ते पिंपरी चिंचवड शहरात ऑटो क्लस्टर येथे झालेल्या शबनम न्यूज मीडिया ग्रुप प्रस्तुत मेट्रो सिटी आयकॉन पुरस्कार समारंभात बोलत होते,

तसेच पिंपरी चिंचवड शहरात मानाचा समजला जाणारा मेट्रोसिटी आयकॉन पुरस्कार ज्यांना मिळाला आहे त्यांना शुभेच्छा देत पुरस्कारार्थींची आता सामाजिक जबाबदारी वाढली असल्याचे खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड शहरातील शबनम न्यूज मीडिया ग्रुप वृत्तसंस्था वतीने दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कायदा व क्रीडा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना मेट्रो सिटी आयकॉन पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यावर्षी मेट्रो सिटी आयकॉन २०२४ पुरस्काराचे आयोजन करण्यात आले. (PCMC)

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, कामगार नेते शिवसेना उपनेते इरफान सय्यद, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले, सरिता साने सखी मंचच्या अध्यक्षा सरिताताई साने प्रसिद्ध उद्योजक संतोष बारणे, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे , अरुण पवार ,आयोजक सौ. शबनम सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.

शबनम न्यूज मीडिया ग्रुपच्या संस्थापक सौ. शबनम सय्यद यांच्या वतीने आयोजित या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने मेघराज भोसले यांच्या हस्ते शबनम न्यूज या वृत्तसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

पुरस्काराने सामाजिक कामाची ऊर्जा मोठ्या प्रमाणात निर्माण होते – मेघराज राजेभोसले

यावेळी मेघराज भोसले म्हणाले की, सामाजिक काम करताना आपल्याला जेव्हा पुरस्कार मिळतो तेव्हा सामाजिक कामाची ऊर्जा मोठ्या प्रमाणात निर्माण होते. तसेच आपली जबाबदारी ही वाढते. शबनम न्यूज मीडिया ग्रुप मार्फत दरवर्षी मेट्रोसिटी आयकॉन पुरस्कार देऊन समाजात चांगले काम करणाऱ्यांची दखल घेतली जाते. याचे आम्हा सर्वांना कौतुक आहे असे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी सांगितले.

शबनम न्यूज या वृत्तसंस्थेने विश्वासहर्ता टिकवून ठेवली – भाऊसाहेब भोईर

यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी आपल्या भाषणात सांगितले कि, शबनम न्यूज या वृत्तसंस्थेने आपल्या सुरुवातीपासूनच एक विश्वासहर्ता टिकवून ठेवली आहे. जे सत्य आहे ते समाजापर्यंत पोहोचण्याचे काम शबनम न्यूज वृत्तसंस्थेमार्फत होत आहे. अनेक समाज माध्यमे वाढली आहे, जशी लोकसंख्या वाढते तसे न्यूज पोर्टल ही वाढत चालले आहे. परंतु प्रामाणिकपणे काम करत असताना शबनम न्यूज वृत्तसंस्थेने आपलं एक अस्तित्व निर्माण केल आहे. असे भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले.

तसेच यावेळी शिवसेनेचे कामगार नेते इरफान भाई सय्यद, सरिता साने सखी मंचच्या अध्यक्ष सौ सरिता अरुण साने, कामगार नेते यशवंत भोसले, प्रसिद्ध उद्योजक संतोष बारणे यांनी आपापले मनोगत व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. (PCMC)


या पुरस्कार सोहळ्यामध्ये अधिरा इंटरनॅशनल स्कूल पुनावळे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, युवा नेते बापू दिनकर कातळे, शैला निकम, निर्विकार आयुर्वेदिक हॉस्पिटल चे डॉक्टर निलेश लोंढे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर, ज्योती संदीप भालके, अँड. कांता गोर्डे-शेजवळ, डॉक्टर सायली प्रवीण बारसे, महिला उद्योजिका अंकिता अनिल राऊत, ज्योती गोफणे, मनीषा चंद्रकांत शिंदे, युवा नेते प्रवीण दिलीप माळी, कीर्ती मारुती जाधव, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे शहराध्यक्ष विजय गोविंद जरे, श्रीमती शोभा उर्फ नाणी जगताप यांना मेट्रोसिटी आयकॉन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच या निमित्ताने समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा विशेष सन्मान करण्यात आला यामध्ये सामाजिक कार्यकर्ते राहुल कोलाटकर. राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष इमरान शेख. ज्येष्ठ पत्रकार बापू गोरे. डॉ. शैलेश देशपांडे. शिक्षक श्री योगेश ढावरे. वृत्तपत्र विक्रेते अनिल दळवी, सामाजिक कार्यकर्ते संभाजी बारणे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर , ॲड. दीपक साबळे व पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे विजय पारगे यांना विशेष सन्मानित करण्यात आले.

PCMC

तसेच यावेळी महिला बचत गटांचाही सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रसन्न महिला बचत गट, निधी महिला बचत गट, मातोश्री महिला बचत गट, जिजाई महिला बचत गट, येसू महिला बचत गट, तुळजाई महिला बचत गट, अंबिका महिला बचत गट ,यशोधरा महिला बचत गट, जिजाऊ महिला बचत गट, क्रांती महिला बचत गट, वनमाला महिला बचत गट, सखी महिला बचत गट, या बचत गटांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक गजाला सय्यद यांनी केले तर आभार आसिया इनामदार यांनी व्यक्त केले तसेच सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक भाऊसाहेब कोकाटे यांनी केले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

अणूशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे निधन

जगातील सर्वाधिक पगार घेतो ‘हा’ भारतीय वंशाचा माणूस, पगार ऐकून थक्क व्हाल

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव

‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे सरकारने घेतले परत ? वाचा काय आहे प्रकरण !

चीनमध्ये पुन्हा कोरोनासारख्या नव्या विषाणूचा कहर, जगाची चिंता वाढली

मोठी बातमी : शेतकऱ्यांना मोठा दिलासा : ‘त्या’ जमिनी परत करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कंडोमपासून आलू भुजियापर्यंत ऑनलाईन विक्रमी खरेदी, यादी एकदा वाचाच !

Related Articles

- Advertisement -

Latest Articles