Friday, May 10, 2024
Homeजिल्हाकोल्हापूर : कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून शहर वाहतूक शाखेने केला 66,36,500 इतका...

कोल्हापूर : कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून शहर वाहतूक शाखेने केला 66,36,500 इतका दंड वसूल

33,028 इतक्या केसेस दाखल

कोल्हापूर (यश रुकडीकर) : कोल्हापूर शहरात 15 एप्रिल 2021 ते 18 जून 2021 या कालावधीत शहर वाहतूक शाखेकडून विनाकारण बाहेर पडणाऱ्या वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली.

साधारण दोन महिन्यांच्या कालावधीत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या  वाहन धारकांवर कारवाई केली व त्यामधे 33028 इतक्या केसेस नोंदवून त्यांच्याकडून तब्बल 66,36,500 इतका दंड वसूल करण्यात आला.

■ सविस्तर माहिती खालीलप्रमाणे : 

●  ट्रिपल सीट 680 केस त्यांच्याकडून 1,36,000 इतका दंड वसूल

● विना मास्क 453 केस त्यांच्याकडून 2,26,500 इतका दंड वसूल

● विना हेल्मेट 55 केस व त्यांकडून 27,500 इतका दंड वसूल

● नो पार्किंग 1108 केसेस व 2,21,600 इतका दंड वसूल

● मोबाईलवर बोलणे 959 केसेस व 1,91,800 इतका दंड वसूल

● विना नंबर प्लेट 3,945 केसेस व 8,03,400 इतका दंड वसूल

● विना लायसेन्स 26,281 इतक्या केसेस व 5,25,600 इतका दंड वसूल करण्यात आला


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय