सांगोला : कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या व रुग्णांना ताबडतोब उपचार व्हावेत म्हणून खवासपुर येथे डॉ. भाई गणपतराव देशमुख कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यात आले. सदर कोव्हिड सेंटर शेतकरी कामगार पक्षाचे उत्तम जरे यांच्या प्रयत्नांतून व पुढाकारांने सुरु केले.
कोव्हिड सेंटरचे उद्घाटन राज्याचे आयकर आयुक्त सचिन मोटे व शेकापक्षाचे नेते चंद्रकांत देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी पंचायत समिती सभापती राणीताई कोळवले, कोव्हीड सनियंत्रण अधिकारी डॉ. संदीप देवकते, कुंडलीक आलदर, महुद प्राथमिक आरोग्य केद्राचे डॉ. ढाळे, खवासपुर गावचे उपसरपंच व सदस्य तसेच सोसायटीचे माजी चेअरमन हे उपस्थित होते.