Monday, May 6, 2024
Homeआरोग्यकोरोनामृत्यू तांडव सुरूच : कोव्हिड रुग्णालयाला लागलेल्या आगीत 18 जणांचा मृत्यू, ICU...

मृत्यू तांडव सुरूच : कोव्हिड रुग्णालयाला लागलेल्या आगीत 18 जणांचा मृत्यू, ICU जळून खाक

अहमदाबाद : गुजरातमधल्या भरूच शहरातल्या कोव्हिड रुग्णालयात लागलेल्या आगीत १८ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रात्री साडेबाराच्या सुमारास पटेल वेल्फेअर रुग्णालयात ही आग लागली.

काही रुग्णांवर व्हेंटिलेटरच्या माध्यमातून उपचार सुरू होते. त्यावेळी आग लागून संपूर्ण आयसीयू विभागात पसरली असं रुग्णालय अधिकाऱ्यांनी सांगितलं. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही मात्र प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

रुग्णालयाला आग लागल्याचं कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीत आयसीयू विभागाचा दरवाजा वेढला गेल्याने खिडक्या तोडून अडकलेल्या माणसांची सुटका करण्यात आली. मात्र आतापर्यंत या दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

या दुर्घटनेतून सुटका करण्यात आलेल्या रुग्णांना अल महमूद रुग्णालय, भरूच सिव्हिल रुग्णालय, सेवाश्रम रुग्णालय, गुजरात हॉस्पिटल अशा ठिकाणी हलवण्यात आलं.

या रुग्णालयात कोव्हिडची सर्वसाधारण लक्षणं जाणवणाऱ्या रुग्णांवरही उपचार सुरू झाले आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय