Friday, May 3, 2024
Homeराजकारणकेरळ विधानसभा निवडणूका : डाव्या आघाडीकडून आदर्शवत भूमिका, निवडणूकीत तरुणांंना संधी

केरळ विधानसभा निवडणूका : डाव्या आघाडीकडून आदर्शवत भूमिका, निवडणूकीत तरुणांंना संधी

केरळ : देशात विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. केरळच्या विधानसभांच्या सभांना जोर चढला आहे. तर केरळच्या डाव्या आघाडीने पुन्हा एकदा तरुणांना संधी देत आदर्श ठेवला आहे. डाव्यांकडे नेतृत्वात आणि राजकारण तरुण नसल्याची टिका होत होती. परंतु नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये डाव्या आघाडीने तरुणांना संधी दिली होती. तरुणांना राजकारणाकडे आकर्षित करण्याचा हा प्रयत्न असल्याचे ही बोलले जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत केरळच्या डाव्या आघाडी सरकारने आदर्श ठेवत २१ वर्षाच्या आर्य राजेंद्रन यांना तिरुअनंतपुरम येथील महापौर केले होते. 

केरळातील मलप्पुरम लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व्ही.पी.सानू हे डाव्या आघाडीचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले. तर विधानसभेच्या निवडणूकांसाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे राज्य सचिव के. एम. सचिन देव, माजी राज्य अध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे नेते जॅक थॉमस, SFI चे माजी राज्य सचिव एम. व्हिजिन हे डाव्या आघाडीचे उमेदवार आहेत.

 

देशात डाव्या राजकारणात तरुणांचा वाढत सहभाग आणि तरुणांना दिली जाणाऱ्या संधीकडे याबाबत चर्चा घडू लागल्या आहेत. तरुणांना दिली जाणारी संधी डाव्या राजकारणाला एका वेगळ्या वळणार घेऊन जाईल, असेही मत जाणकार व्यक्त करत आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय