Saturday, May 18, 2024
Homeजुन्नरके. एस. ढोमसे यांची अखिल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा...

के. एस. ढोमसे यांची अखिल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाच्या राज्य अध्यक्षपदी एकमताने निवड 

पुणे : अखिल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाची राज्य कार्यकारिणीची सभा महामंडळाचे राज्य अध्यक्ष मारोती खेडेकर यांचे अध्यक्षतेखाली व संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी यांचे प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक 12/12/2022 रोजी सकाळी 11 वाजता चंदननगर, पुणे येथे संपन्न झाली. सदर सभेमध्ये संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी यांचे मार्गदर्शनाखाली राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या नूतन कार्यकारिणीची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. 

यामध्ये महामंडळाच्या राज्य अध्यक्षपदी के. एस. ढोमसे (पुणे) तर सचिवपदी  मोती भाऊ केंद्रे (नांदेड) यांची एकमताने निवड करण्यात आली. 

• नूतन राज्य कार्यकारिणी पुढील प्रमाणे :

१. संस्थापक अध्यक्ष – रावसाहेब आवारी(पुणे )

२. अध्यक्ष – के. एस. ढोमसे (पुणे )

३. कार्याध्यक्ष – मोहनराव सोनवणे पाटील ( औरंगाबाद), अशोक पारधी ( भंडारा )

४. उपाध्यक्ष – नंदकुमार बारवकर (पुणे), शत्रुघ्न बिरकड (अकोला), प्रकाश देशमुख (लातूर).

५. सचिव – मोती भाऊ केंद्रे (नांदेड)

६. कोषाध्यक्ष – विलास भारसाकळे ( बुलढाणा)

७. वार्तापत्र संपादक – देविदास उमाठे (परभणी)

८. विद्या सचिव – मनोहर पवार (कोल्हापूर ), दिलीप पाटील (उस्मानाबाद), प्रवीण दिवे ( अमरावती).

९. ऑडिटर – गोविंद फुलवाडे ( हिंगोली).

१०. सहसचिव – एस. बी. देशमुख (नाशिक), सतीश जगताप (वर्धा).

११. सह वार्तापत्र संपादक – प्रमोद नेमाडे (पुणे), सज्जन पाटील (नागपूर ).

१२. संघटक – भागचंद औताडे (अहमदनगर), नरेश चंद्र वाळके ( वर्धा ), हणमंतराव साखरे (नांदेड), दत्ताजी कदम (कोल्हापूर).

१३.महिला प्रतिनिधी – ममता गवळी (नागपूर शहर )

१४. मार्गदर्शक – वसंत पाटील (लातूर), मारोती खेडेकर (नागपूर ).

के.एस‌.ढोमसे हे महाराष्ट्र शासनाचा गुणवंत पुरस्कार प्राप्त माजी मुख्याध्यापक आहेत. ते महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी (टिडीएफ) चे राज्य विश्वस्त आहेत. त्यांनी यापूर्वी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष, पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी (टिडीएफ) चे अध्यक्ष अशी विविध पदे संघटनेत भुषविली आहेत. या विविध पदांच्या माध्यमातून त्यांनी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न सोडविले आहे. ते जुन्नर मधील अण्णासाहेब आवटे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आहेत. त्यांच्या निवडीबद्दल शिक्षणक्षेत्रात सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Lic

LIC
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय