Thursday, December 26, 2024
Homeआरोग्यकोरोनाजुन्नर तालुक्यात १०२ कोरोना पॉझिटिव्ह, 'या' गावातील संख्या सर्वांत जास्त

जुन्नर तालुक्यात १०२ कोरोना पॉझिटिव्ह, ‘या’ गावातील संख्या सर्वांत जास्त

जुन्नर : देशभरात महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा विस्फोट होताना दिसत आहे. तालुक्यात मागील २४ तासात १०२ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.

यामध्ये जुन्नर नगरपालिका ८, नारायणगाव १६, आगार ८, ओतूर ६, वडगांव आनंद ६, आळे ६, बेल्हे ६, पारगांव तर्फे आळे ४, निमगाव सावा ३, कुमशेत ३, पिंपरी पेंढार २, पिंपळवंडी २, कुरण २, शिरोली बु. २, गुजाळवाडी आर्वी २, हिवरे तर्फे ना.गाव १, तांबे १, मंगरूळ १, शिरोली तर्फे आळे १, वारूळवाडी १, धनगरवाडी १, आर्वी १, डिंगोरे १, वडगांव कांदळी १, कांदळी १, बोरी बु. १, खानापूर १, जळवंडी १, धोलवड १, वडगांव साहणी १, उदापूर १ यांचा समावेश आहे. तर केवाडी येथील ६८ वर्षीय पुरुष व गुजाळवाडी आर्वी येथील ७५ वर्षीय पुरुषांचा मृत्यू झाला आहे.

तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ७ हजार ३९६ झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६ हजार ६०८ तर आता पर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २७२ असून सध्या तालुक्यात ५१६ ऍक्टिव करोना रुग्ण आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय