Wednesday, August 17, 2022
Homeग्रामीणजुन्नर : अतिवृष्टीने पिडीत कुटुंबांना 'मनसे' चा आधार

जुन्नर : अतिवृष्टीने पिडीत कुटुंबांना ‘मनसे’ चा आधार

spot_imgspot_imgspot_imgspot_img

जुन्नर : कोल्हेवाडी, ता. जुन्नर येथील अतिवृष्टीमुळे पिडीत कुटुंबांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मदतीचा आधार दिला. दोन महिने पुरेल एवढा किराणा दिला. पुढेही आपले पाठिशी उभे राहू व सरकारी मदत मिळवण्यासाठी मदत करू, असा शब्द दिला.

वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी मुळे सखाराम विठ्ठल भालेराव, काशीनाथ चिखले आणि पांडुरंग मराडे यांची घरं पूर्णपणे पडली. यामध्ये या कुटुंबाचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, या कुटूंबांना खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत असून संसार उघड्यावर पडला आहे.

अशातच मनसे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे,  मनसे तालुका अध्यक्ष साईनाथ ढमढेरे, उपतालुका अध्यक्ष दिलीप खिलारी,  नंदाकिशोर जगताप, राविराज चाळक, दिपक गुंजाळ, विकी मनसुख, विकास मोरे, प्रशांत खराडे, अनिल देशपांडे, अवधूत अष्टेकर, योगेश तोडकर, सुभाष जगताप, अशोक बोडके, संपत खर्डे, अनिल शिंदे व अन्य उपस्थित होते.


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय