जुन्नर : आंबट गोड चवीने सर्वांच्या तोंडाला पाणी आणणाऱ्या पांढऱ्या शुभ्र फुला – फळांनी डोंगरची काळी मैना बहरली आहे. यामुळे निसर्गाच्या सुगंधासह रानमेव्यात भर पडली आहे. आंबे – हातविज भागात “डोंंगरची काळी मैैैना” बहरली आहे.
डोंगरची काळी मैना म्हटले की उन्हाळ्यातील रानमेवा म्हणून करवंदाकडे बघितले जाते. याच करवंदींना पांढऱ्या शुभ्र फुलांचा आणि फळांचा बहर आला आहे.
ग्रामीण भागात कच्च्या करवंदापासून लोणचे तयार केले जाते. डोंगर कपारीत नैसर्गिकरित्या उगवणारी, निचऱ्याच्या जमिनीत फुललेल्या हा रानमेव्या निसर्गाच्या सौदर्यात भार टाकत आहे. तळमाची भागात अनेक ठिकाणी फुला – फळांनी करवंदाची झाडे लगडली आहेत.
या परिसरामध्ये विविध भागातील नागरिक येतात. करवंदांचा अस्वाद घेतात. तसेच करवंदे विक्रीसाठी देखील नेण्यात येतात.