Thursday, December 26, 2024
Homeग्रामीणजुन्नर : हडसर किल्ल्यावर सापडल्या मोठ्या तोफा

जुन्नर : हडसर किल्ल्यावर सापडल्या मोठ्या तोफा

जुन्नर : जुन्नर येथील हडसर किल्यावर मोठ्या दोन तोफा आढळून आल्या आहेत. किल्ले संवर्धनाचे काम चालू असताना बुधवार (दि. १४) हडसर किल्ल्यावरील कमानी टाकी मधील गाळ काढत असताना या तोफा आढळून आल्या. 

गेल्या तीन वर्षापासून मरहट्टे सह्याद्री हा समूह शिवाजी ट्रेल दुर्गसंवर्धन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली किल्ले हडसर येथे किल्ले संवर्धनाचे काम करीत आहे. याचाच एक भाग म्हणून पाण्याच्या टाकीतील गाळ काढत असताना या मोठ्या दोन तोफा आढळून आल्या.

साधारणत एक तोफेची लांबी सात फूट व व्यास चार इंच आहे. दुसऱ्या तोफेची लांबी सात फूट व व्यास दोन इंच असल्याचे शिवाजी ट्रेलचे विश्वस्त  विनायक खोत यांनी सांगितले. याचबरोबर एक तोफ दोन ते तीन टन वजनाची तर दुसरी तोफ तीस ते चाळीस किलो वजनाची असल्याचा अंदाज देखील त्यांनी व्यक्त केला असून त्या मकर मुख असाव्यात असेही “महाराष्ट्र जनभुमी”शी बोलताना ते म्हणाले. 

जुन्नर तालुक्यात प्रथमच एवढ्या मोठ्या तोफा सापडल्या असल्याचे निसर्ग प्रेमी रमेश खरमाळे यांनी सांगितले. या सापडलेल्या तोफांमुळे गडाचा इतिहास उलगडण्यात आणखी मदत होईल असे मत किल्ले संवर्धन प्रेमी अमोल ढोबळे यांनी व्यक्त केले आहे.

संपादन : सुमती डोंगरे

संबंधित लेख

लोकप्रिय