Wednesday, April 23, 2025
---Advertisement---
---Advertisement---

जुन्नर : मुलींचे शासकीय वसतिगृह येथे सावित्रीबाई फुले व जयपाल सिंग मुंडा यांची संयुक्त जयंती साजरी

---Advertisement---
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना…

जुन्नर : आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह जुन्नर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व जयपाल सिंग मुंडा यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

---Advertisement---

यावेळी रूपष्री महिला विकास संस्था, जुन्नर येथील अश्विनी नवले यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनल तळपे होत्या‌. यावेळी गृहपाल अर्चना पवार, रमेश पाटोळे, सुनीता शेळकंदे, बेबी गागरे यांची उपस्थिती होती. यावेळी सोनल तळपे या विद्यार्थीनींने ‘व्हय मी सावित्री बोलते’ ही एकांकिका सादर केली.

यावेळी विद्यार्थीनींशी संवाद साधताना अश्विनी नवले म्हणाल्या, “आयुष्य मध्ये आपण आपले एक उद्दिष्ट ठरवले पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण सतत प्रयत्न केले पाहिजे. तसेच यश संपादन करण्यासाठी कष्ट, चिकाटी आणि आत्मविश्वास असणे खूप गरजेचे आहे आणि असा जर आपला प्रवास असेल तर आपण नक्कीच यश संपादन करू शकतो.”

संयुक्त जयंती कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थीनी

जुन्नर वासियांसाठीही सावित्रीबाई व ज्योतिबांचे योगदान मोठे – अर्चना पवार

तर गृहपाल अर्चना पवार म्हणाल्या, “सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांनी जुन्नर तालुक्यातील ओतूर या गावी सारा बंदी चळवळ उभी केली. दुष्काळी परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून न डगमगता ओतूर दुष्काळ निवारण करण्यासाठी मोठी अन्नछत्र उभारली. ओतूर खटला प्रकरणात स्वतःची ४५ एकर जमीन विकावी लागली. सावकारशी, जमीनदारांशी असहकार लढा पुकारला. दुष्काळ ग्रस्त मदतीसाठी सावित्रीबाई ओतुरला निवासी होत्या. त्यांनी ज्योतिबांना पत्र लिहून जुन्नर मधील दुष्काळ निवारण करण्यासाठी मदत पाठवावी असे कळवले. त्यामुळे जुन्नर वासियांसाठीही सावित्रीबाई व ज्योतिबा फुले यांचे योगदान मोठे होते.

सावित्रीबाईंनी पुण्यात सुरू केलेल्या शाळेत ९ विद्यार्थीनी होत्या. त्यात अस्पृश्य समाजातील अधिक विद्यार्थीनी असत. फुले ना मारेकरी पाठवण्यात आले, त्यात लहुजी साळवे होतें. त्यांनी आपल्या नातीमध्ये झालेला बदल शाळेत जाऊन पाहिला आणि फुले दांपत्याला मारण्याऐवजी ते त्यांचे रक्षणकर्ते झाले, असेही पवार म्हणाल्या.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन स्वाती गवारी यांनी केले. तर दिपाली पारधी, संध्या रावते, अपेक्षा साबळे, धनश्री भवारी या विद्यार्थीनींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थीनी उपस्थित होत्या.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles