फिरती माती, पाणी व पानदेठ परिक्षण प्रयोगशाळा अॅग्रो अॅम्बुलन्स् लोकार्पण सोहळा संपन्न
पुणे : पुणे जिल्हा परिषद, कृषी विभाग यांच्या माध्यमातून फिरती माती, पाणी व पानदेठ परिक्षण प्रयोगशाळा अॅग्रो अॅम्बुलन्स् लोकार्पण सोहळा आज राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजित पवार यांच्या शुभहस्ते विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे पार पडला.
जुन्नर तालुक्यातील नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राला हि अॅग्रो अॅम्बुलन्स देण्यात आली असून याचा फायदा तालुक्यातील शेतकऱ्यांना व कृषी क्षेत्रातील संशोधन कार्यास होणार आहे.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मलाताई पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, कृषी समिती सभापती बाबुराव वायकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आमदार अतुल बेनके, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष अनिल मेहेर, प्रकाश पाटे यांच्या सह विविध मान्यवर व प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला.