ओतूर : सिटू संलग्न अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित निरोप समारंभ व सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला.
जुन्नर तालुक्याचे महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी हाके यांची अकोले तालुका महिला बालकल्याण प्रकल्प येथे बदली झाली तसेच पर्यवेक्षिका अश्विनी कानवडे यांची ओतूर बीट २ यांची बदली झाली. तसेच सेविका ताराबाई बरबडे याची सेवानिवृत्ती झाली, यानिमित्ताने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
हे पण पहा ! जुन्नर : इंगळून येथे भव्य रोजगार मेळावा
या कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि अभिवादन केले. त्यानंतर प्रमुख मान्यवरांचे सेविकांच्या हस्ते मान्यवरांना भारताचे संविधान फ्रेम आणि शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक संघटनेचे समन्वयक लक्ष्मण जोशी यांनी केले त्यानी सांगितले की आपण हा कार्यक्रम खर तर ऋणानुबंध व्यक्त करण्यासाठी या निमित्ताने करत आहोत. अंगणवाडी कर्मचारी ही शिक्षण व्यवस्थेचा पाया निर्माण करण्याचे फार मोठे काम करत आहे.
हे पण पहा ! जुन्नर : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल
महिला बालविकास अधिकारी हाके म्हणाले, सेविका ह्या प्रामाणिक काम जुन्नर तालुक्यात करत आहेत. प्रशासन आणि सेविका याचा चांगला समन्वय ठेवला आणि प्रामाणिक काम केले तर कोणताही समस्या सहजतेने सोडवता येते. माझ्या जुन्नर तालुक्यातील 5 वर्षच्या कार्यकाळात खूप चांगला अनुभव आला आणि शेवटी मला जी संविधान फ्रेम दिली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले.
अश्विनी कानवडे म्हणाल्या, ओतूरमधील सर्व सेविकांशी माझा चांगला संपर्क होता. त्यामुळे या भागात अंगणवाडी सेविकाचे काम हे प्रामाणिकपणे केले.
त्यानंतर ताराबाई बरबडे म्हणाल्या, संघटना ही सेविका आणि मदतनिस याचा आधार आहे. संघटनेत काम करत असताना दुसरीकडे सेविका पदाची सेवा चांगली आणि चोख बजावली आणि संघटनेचे काम जोमाने केले। ते मांडताना त्यानां अश्रू अनावर झाले होते.
त्यानंतर सेविका शुभांगी शेटे, मनिषा भोर, लीला आबडेकर, रोहिणी गाढवे, सपना ओटी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
हे पण वाचा ! पुणे : जुन्नर तालुक्यातील पर्यटन आणि तीर्थक्षेत्र विकासासाठी भरगच्च निधी !
तसेच अश्विनी कानवडे याच मोलाचे मार्गदर्शन त्याच्या सेवेतील कार्यकाळात लाभले
त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा शुभांगी शेटे यांनी अध्यक्ष भाषणामध्ये बरबडे बाई या आमच्या मार्गदर्शक आहेत आणि संघटनेत कायम आम्हाला मार्गदर्शक म्हणून राहतील तसेच हाके साहेब आणि अश्विनी कानवडे मॅडम या जे आम्हाला मोलाचे सहकार्य केले आणि जिथे चुकेल तिथे ती चूक सुधारण्यासाठी संधी दिली. आपल्या सेवा कार्यकाळात उत्तम सेवा दिल्या. त्यानंतर सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली
यावेळी संघटनेच्या अध्यक्षा शुभांगी शेटे, सचिव मनीषा भोर, रोहिणी गाढवे, सपना औटी, सुप्रिया खरात, ओतूर अंगणवाडी तीनही बीटच्या सेविका उपस्थित होत्या.