जुन्नर : खिरेश्वर (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सत्वशील हरिश्चंद्र बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना मराठी सचित्र, बालमित्र, अंकलिपी, इंग्रजी प्रायमर, नवनीत सुरेख उजळणी, पाटी, खोडरबर, पेन्सिल, शार्पनर, पट्टी, पेन तसेच खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी बुधाजी कवटे, सिताराम कोरडे, नितीन मेमाणे, महेंद्र गवारी, नितिन मुठे, अमोल कोरडे, अलका कोरडे, जयश्री कोरडे, नक्षत्रा सुरकुले व शिवराज कोरडे तसेच ठोंगिरे सर, तांबे मॅडम, बगाड सर, जगताप मॅडम, इंदूबाई मुठे, संतोष मेमाणे, मनीषा मेमाणे, चिमाजी मुठे, हौसाबाई मुठे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.