Friday, March 29, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडसावली बेघर निवारा केंद्रात साड्या आणि कपडे वाटप

सावली बेघर निवारा केंद्रात साड्या आणि कपडे वाटप

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित ‘वुई टू गेदर फाउंडेशन’चा उपक्रम

पिंपरी चिंचवड
: शहरातील चौका- चौकात, फुटपाथ, बस स्टॉपवर फिरणाऱ्या, निराश, विकलांग, विमनस्क आणि मोकळ्या मैदानात किंवा फुटपाथवर वावरणाऱ्या शहरातील बेघरांसाठी कार्य करणाऱ्या पिंपरी कॅम्प येथील सावली निवारा केंद्रातील 17 महिला आणि 38 पुरुषांना वुई टूगेर फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने साड्या, स्वेटर, टी शर्ट, पॅन्टचे वाटप करण्यात आले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सामाजिक विकास विभाग आणि रिअल लाईफ रिअल पीपल या संस्थेच्या संयुक्त उपक्रमातून सावली निवारा केंद्र 2020 पासून सुरू करण्यात आले आहे. निवारा केंद्र आणि रिअल लाईफ रिअल पीपल संस्थेचे संस्थापक एम.ए. हुसेन आणि व्यवस्थापक गौतम थोरात यांनी सांगितले की, पंडित दीनदयाळ अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियाना अंतर्गत महापालिकेच्या नागरवस्ती विभागाच्या सहकार्याने पिंपरी भाजी मंडई येथे मनपाने 2020 मध्ये हे निवारा केंद्र सुरू केले आहे.

आमचे स्वयंसेवक येथील बेघर, विपन्न लोकांची सेवा शुश्रूषा करतात. रस्त्यावर खितपत पडलेल्या नागरिकांना आम्ही निवारा, अन्नवस्त्र, औषधे ई देतो. त्यांचे आधारकार्ड, ओळखपत्रे मिळवून देतो. मनोविकार, शारीरिक व्यंग, व्यसनाधीनता, व्याधीग्रस्त बेघर लोकांना पिंपरी चिंचवड महानगपालिकेच्या रुग्णालयातून उपचार मिळतो. केंद्रातील 24 खोल्यामध्ये त्यांना अन्न, वस्त्र देऊन त्यांचे आयुष्य पुन्हा उभे केले जाते. विविध क्षेत्रातील सेवाभावी कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे त्यांचे पुनर्वसन करण्यात आम्ही यशस्वी होत आहोत.

वुई टूगेदर संस्थेचे अध्यक्ष सलीम सय्यद म्हणाले की, कुटुंबापासून दूर लोटलेल्या शहरात विमनस्क होऊन फुटपाथवर सापडलेल्या उतार वयातील महिला पुरुषांना आधार देणारा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा कोरोना महामारी मध्ये सुरू केलेला हा उपक्रम देशात उल्लेखनीय ठरला आहे.

सलीम सय्यद, सोनाली मन्हास, शैलजा कडुलकर, दारासिंग मन्हास, दिलीप पेटकर, स्वप्निल जेवळे यांनी 17 महिला 37 पुरुषांना उपयुक्त कपड्यांचे वितरण केले. यावेळी गौतम थोरात, सचिन बोधनकर, अमोल भाट, मिलिंद माळी, अग्निश फ्रान्सिस, सुनीता श्रीनाथ, लक्ष्मी वायकर, उमा भंडारी स्वयंसेवक यावेळी उपस्थित होते.

संस्थेच्या अर्चना पवार, सारीका जाधव, गीता दोडमनी, गौरी साकुरे, स्मिता बागल, स्नेहा पर्वतकर, रुपाली भस्मे, मनीषा लाटकर, शेहेनाज शेख, सोनाली शिंदे, संध्या सातव, माधुरी डिंगणे, नीता सूर्यवंशी यांनी साड्या कपडे गोळा केले होते.

– क्रांतिकुमार कडुलकर

Lic Kanya Yojana
संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय