जुन्नर / आनंद कांबळे : जुन्नर येथील राजमाता जिजाऊ महिला विकास मंचातर्फे आगळावेगळा हळदीकूंकु समारंभ संपन्न झाला. सोमवारी सायंकाळी मंचातर्फे हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी कोरोना काळात महत्त्वाची भूमिका बजावणारे डाँक्टर, पोलिस, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी, सफाई कामगार महिला यांचा खणा नारळाने ओटी भरुन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी डाँ.अनुष्का शिंदे यांनी स्त्री भृणहत्या या विषयावर व्याख्यान दिले. सर्व महिलांनी स्त्री भृण हत्या करणार नाही अशी शपथ घेतली.
बारावी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी ! केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ११४९ जागांसाठी भरती
वाचा ! आपल्याला का वाजते थंडी?
या कार्यक्रमास सुमारे ५०० महिला उपस्थित होत्या. यावेळी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रम ठिकाणी महिलांनी पारंपारिक पद्धतीची सुंदर सजावट केली होती.
या कार्यक्रमासाठी ज्योती चोरडिया, अलका फुलपगार, राखी शहा, नयना राजगुरु, मंगल शिंदे, सुरेखा जढर, सुजाता लुंकड, स्वाती पवार, रुपाली शहा, वैशाली भालेराव, सरिता डोके, नंदा कानडे, गीतांजली डोके, चारुशीला घायवट, वैष्णवी पांडे, विद्या मिरगुंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
जुन्नरकरांसाठी आनंदाची बातमी ! भोसरी ते किल्ले शिवनेरी पीएमपीएमएलचा मुहूर्त ठरला !
गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावा