Tuesday, September 17, 2024
HomeNewsअरुणाचलमध्ये हिमस्खलनात भारतीय लष्कराचे ७ जवान शहीद!

अरुणाचलमध्ये हिमस्खलनात भारतीय लष्कराचे ७ जवान शहीद!

                                   

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील कामेंग सेक्टरमध्ये हिमस्खलनाच्या तडाख्यात भारतीय लष्कराचे ७ जवान शहीद झाले आहेत. हिमस्खलनात ७ जवान अडकल्याची बातमी ६ फेब्रुवारीला देण्यात आली होती. त्यांच्या बचावकार्यासाठी लष्कराने मोहीम राबवली. अनेक तास बचावकार्य राबवण्यात आले. पण जवानांना वाचवण्यात यश आले नाही, असे लष्कराने म्हटले आहे.

बर्फवृष्टीमुळे अनेक ठिकाणी हिमस्खलन झाल्याच्याही बातम्या आहेत. राज्यातील चार राष्ट्रीय महामार्गांसह 731 हून अधिक रस्ते बंद करण्यात आले आहेत. रस्त्यावर साचलेल्या बर्फामुळे सर्वत्र गाड्या अडकल्या आहेत. हिमस्खलनामुळे हिमाचल प्रदेशमध्ये सुट्टीवर जाणाऱ्या पर्यटकांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हिमस्खलनामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.

व्हिडिओ : प्रपोज डे ला विद्यार्थ्यांच्या दोन गटामध्ये तुफान राडा, आडव तिडवं पाडून एकमेकांना कुदवलं

कर्नाटक हिजाब बंदी प्रकरण : राज्यकर्ता पक्षच तेथे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवत आहे, माकपचा आरोप

संजय राऊतांच्या पत्राने राजकीय वर्तुळात भुकंप, केले गंभीर आरोप

संबंधित लेख

लोकप्रिय