Jharkhand Railway : झारखंडमधील साहिबगंज भागात रेल्वे ट्रॅकवर बॉम्बस्फोट घडवून आणल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लालमाटिया ते फरक्का या एमजीआर रेल्वे मार्गावर घडलेल्या या स्फोटामुळे ट्रॅकचा 470 सेमी लांबीचा तुकडा उध्वस्त झाला आहे. या घटनेमुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्फोटामुळे रेल्वे ट्रॅकवर 770 सेंटीमीटरचे अंतर निर्माण झाले असून तीन फूट खोल खड्डाही तयार झाला आहे. स्फोटाच्या ठिकाणी रेल्वे ट्रॅक जवळील पिलर क्रमांक 40/1 जवळ हा स्फोट झाला असून, ट्रॅकचा तुकडा पिलर क्रमांक 39/15 येथे सापडला.
स्फोट इतका प्रचंड होता की ट्रॅकचा काही भाग 39 मीटर अंतरावर फेकला गेला. यामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली असून, पोलीस, आरपीएफ आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या स्फोटामागे नेमका कोणाचा हात आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्फोटामागे नक्षलवाद्यांचा हात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, जाणूनबुजून रेल्वे रुळांचे नुकसान केले आहे का, हे देखील तपासले जात आहे.
अद्याप या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. मात्र, या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी देशातील विविध भागांमध्ये रेल्वे ट्रॅकवर अडथळे आणण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या अपघातामागील कारस्थानाचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.
Jharkhand Railway


हेही वाचा :
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार
आमदार अतुल बेनके यांच्या समर्थकांनी घेतली शरद पवारांची भेट, पवारांकडे केली ‘ही’ मागणी
दिवाळीपूर्वीच महागाईचा झटका! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या नवे दर
नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल
अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात उपचार सुरू
मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा विजय, आदित्य ठाकरेंचा दबदबा कायम
महाविद्यालयाच्या आवारात युवतीवर अत्याचार, चार महाविद्यालयीन युवकांवर गुन्हा दाखल
मेट्रोच्या मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू, नागरिकांचा संताप
धक्कादायक : सासरच्या लोकांनी घरातच केला गर्भपात, आई आणि बाळ दोघांचा मृत्यू
भयानक : कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून 22 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार
अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे दहन न करता पुरण्याचा निर्णय, स्थानिकांचा विरोध
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्कांऊटर